esakal | मालाविना दुकाने सुरू; उलाढाल ठप्प

बोलून बातमी शोधा

 Shops without Goods; Turnover down

सध्या किरकोळ दुकानांदाराकडील माल पूर्ण संपला संपला असूनही केवळ शासनाच्या आदेशामुळे माल नसलेली रिकामी दुकाने व्यापारी उघडून बसले आहेत.

मालाविना दुकाने सुरू; उलाढाल ठप्प
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मिरज : कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर देशभर सुरू असलेल्या संचारबंदी आदेशामुळे परप्रांतातुन होणारी धान्य, डाळी खाद्यतेल याची आवक पूर्ण ठप्प झाल्याने सध्या किरकोळ दुकानांदाराकडील माल पूर्ण संपला संपला असूनही केवळ शासनाच्या आदेशामुळे माल नसलेली रिकामी दुकाने व्यापारी उघडून बसले आहेत. फारशी मागणी नसलेल्या वस्तूंची विक्री करून ग्राहकांचे समाधान करण्यात व्यापारी धन्यता मानत आहेत.

बहुतांश दुकान मालकांकडील गहू, तांदूळ, ज्वारी, डाळी, आणि कडधान्ये यांचा साठा जवळजवळ संपला आहे. ठोक विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून मालाची आवक नसल्याचे सांगण्यात येत असल्याने ही टंचाई निर्माण झाल्याचे किरकोळ व्यापारी सांगत आहेत. तर ठोक व्यापारी परप्रांतातून येणार आहे लवकरच पूर्ण बंद झाल्यामुळे आम्ही तरी कोणता माल कुठून आणणार असा सवाल किरकोळ दुकानदारांना करीत आहेत. गेल्या सलग बारा दिवसांपासून सुरु असलेल्या संचारबंदी मुळे सांगली-मिरज शहरात अन्नधान्य अथवा खाद्यतेलाच्या एकाही गाडीची आवक झालेली नाही.

पहिल्या दोन-तीन दिवसातच संचारबंदी आणखी काही काळ चालणार असल्याचे संकेत मिळाल्याने बहुसंख्य ग्राहकांनी याच कालावधीत अन्नधान्याची पडेल त्या दराने मोठ्या प्रमाणात खरेदी केली. ज्यामुळे किरकोळ व्यापाऱ्यांकडील अन्नधान्य हे पहिल्या पाच-सहा दिवसातच बऱ्यापैकी विकले गेले. उर्वरित अन्नधान्याची विक्रीही गेल्या काही दिवसात झाल्याने आता बहुसंख्य दुकानांमधील अन्नधान्याचा साठा संपला आहे. गहू ज्वारी तांदूळ गोडतेल डाळी कडधान्ये यासारख्या वस्तू अत्यल्प प्रमाणात व्यापाऱ्यांकडून ग्राहकांना दिल्या जात आहेत.

अनेक उपनगरांमधील किरकोळ व्यापाऱ्यांकडे तर काहीही माल शिल्लक नसल्याचे स्पष्ट सांगितले जात आहे. सांगली मार्केट यार्ड आणि मिरज मधील ठोक व्यापाऱ्यांकडेच माल नसल्याने आपणाकडे ही माल नसल्याचे सांगत किरकोळ दुकानदार ग्राहकांना परत पाठवत आहेत. केवळ शासनाचा आदेश म्हणून आपण दुकान उघडे ठेवल्याचे ही काही व्यापाऱ्यांनी सांगितले. माल नसेल आणि अन्नधान्याच्या वाहतुकीस परवानगी मिळणार नसेल तर ही परिस्थिती अधिकच गंभीर होणार असल्याचेही काही व्यापारी म्हणाले.

दुकाने उघडी परंतु माल नाही अशा विचित्र परिस्थितीत अनेक ग्राहक आपल्या नेहमीच्या दुकानदाराशी माल घेण्यासाठी हातघाईवर येतो आहे. परंतु दुकानदारही माल नसल्याने ग्राहकांना विनवण्या करून यामध्ये आमचा काही दोष नसल्याचे आणि येत्या काही दिवसात वाहतूक सुरू होईल असे सांगून वेळ मारून नेत आहेत. दुकानातील माल संपल्यामुळे दुकान बंद ठेवणे भाग पडत असल्याचे काही व्यापाऱ्यांनी सांगितले. 

अन्नधान्याची वाहतूक  तातडीने सुरू करावी

सांगली आणि मिरज या दोन्ही शहरात गहू, ज्वारी, तांदूळ ,कडधान्य तसेच डाळी आणि गोडेतेल या सर्व वस्तू परप्रांतातुन येतात.परंतु वाहतूक बंद असल्याने या वस्तूंची आवक पूर्ण ठप्प आहे.त्यामुळे सरकारने दुकानदारांना दुकाने सुरु ठेवण्याची सक्ती करण्याऐवजी अन्नधान्याची वाहतूक अत्यावश्‍यक सेवा म्हणून तातडीने सुरू करावी. अन्यथा परिस्थिती आणखी बिकट होईल याचा गांभीर्याने विचार करावा. 

- विवेक बंडू शेटे, अध्यक्ष, तांदूळ मार्केट असोसिएशन, मिरज