शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत एकुलत्या एक मुलाचा मृत्यू; शिरगुप्पीतील घटना

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे
शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत एकुलत्या एक मुलाचा मृत्यू; शिरगुप्पीतील घटना
Updated on: 

मांजरी : शिरगुप्पी (ता. कागवाड) येथील राहत्या घराला शॉर्टसर्किटने (short circuit fire) आग लागली. यात ग्रामपंचायत सदस्य सोमशेखर शिवानंद पाटील (वय 32) यांचा भाजल्याने मृत्यू झाला आहे. बुधवारी (१२) रात्री एक वाजता ही घटना घडली. कागवाड पोलिस स्थानकांत (kagvad police station) घटनेची नोंद झाली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, शिरगुप्पीचे पोलिस पाटील (shirguppi police patil) शिवानंद पाटील यांचे गावात जुने घर आहे. घराचे बांधकाम व दुरुस्तीचे काम सुरू असल्याने त्यांचे चिरंजीव ग्रामपंचायत सदस्य सोमशेखर शिवानंद पाटील एकटेच झोपले होते. बुधवारी रात्री शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीची कल्पना आली नाही. संपूर्ण घराला आगीने वेढल्याने यात त्यांचा मृत्यू झाला. रात्री घराला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी नागरिकांनी आटोकाट प्रयत्न केला. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते.

शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत एकुलत्या एक मुलाचा मृत्यू; शिरगुप्पीतील घटना
कोरोना काळात रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी प्रोटिन्सचं रुटीन ठरतंय फायद्याचं

यावेळी घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती. आज (१३) सकाळी घटनास्थळी कागवाड पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक हनुमंत धर्मटी व त्यांच्या सहकाऱ्यांनी भेट देवून पंचनामा करून गुन्हा नोंदवला आहे. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. पोलिस उपनिरीक्षक हनुमंत धर्मटी हे अधिक तपास करत आहेत.

एकुलता एक चिरंजीव व ग्रामपंचायत सदस्य

शिरगुप्पी गावचे पोलिस पाटील शिवानंद पाटील यांना सोमशेखर हे एकुलते चिरंजीव होते. नुकतीच शिरगुप्पीत त्यांची ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवड झाली होती. त्यांच्या अकाली अपघाती निधनामुळे शिरगुप्पी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत एकुलत्या एक मुलाचा मृत्यू; शिरगुप्पीतील घटना
देशाच्या इतिहासातील महत्त्वाचा दिवस; जाणून घ्या १३ मेविषयी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Why was Gopichand Padalkar’s nomination challenged?
Sujat Ambedkar allegations on voter registration process,
sai paranjpye
Sangli ST 1519 special bus trips Ganesh festival
Marathi News Esakal
www.esakal.com