कामावर उशिराने येणाऱ्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस - नितेश पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nitesh Patil

कामावर उशिराने येणाऱ्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी तहसीलदार आर. के. कुलकर्णी यांना बजावले आहेत.‌

कामावर उशिराने येणाऱ्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस - नितेश पाटील

बेळगाव - कामावर उशिराने येणाऱ्या अधिकाऱ्यांना (Officers) कारणे दाखवा नोटीस (Notice) बजावण्याचे आदेश जिल्हाधिकारी नितेश पाटील (Nitesh Patil) यांनी तहसीलदार आर. के. कुलकर्णी यांना बजावले आहेत.‌

जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी शुक्रवारी (ता. १३) अचानक तहसील कार्यालयाला भेट दिली. प्रारंभी त्यांनी जुन्या तहसील कार्यालयाला भेट देऊन त्या ठिकाणी पाहणी केली.‌ याठिकाणी सुरू असलेल्या जनस्नेही केंद्रातील कामाचा आढावा घेऊन नंतर जुन्या महापालिकेतील तहसील कार्यालयाला भेट दिली. यावेळी अनेक कर्मचारी कामाची वेळ झालेली असताना देखील गैरहजर असल्याचे दिसून आले. त्यामुळे संतप्त झालेल्या जिल्हाधिकारी श्री.‌ पाटील यांनी तहसीलदार कुलकर्णी यांना धारेवर धरले. तहसीलदारांचे कर्मचार्‍यांवर वचक नाही का? असा सवाल उपस्थित केला. कर्मचारी वेळेत हजर नसल्याने जनतेची कामे‌ कशी होतील, अशी विचारणा केली. यावेळी तहसीलदार श्री. कुलकर्णी यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

मात्र, जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी कामावर उशिराने हजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले. यावेळी कार्यालयात विनामास्क उपस्थित राहिलेल्या कर्मचाऱ्यांना देखील त्यांनी धारेवर धरले. करोनाचा संसर्ग पूर्णपणे गेलेला नसून कर्मचारीच मास्क वापरत नसतील तर कसे? अशी विचारणा त्यांनी कर्मचाऱ्यांना केली. तसेच सर्वांना आपल्या समक्षच मास्क परिधान करण्यास भाग पाडले. कार्यालयातील विविध विभागांची पाहणी करून कागदपत्रांची देखील त्यांनी पडताळणी केली. तहसील कार्यालयातील स्वच्छतेबाबत देखील त्यांनी समाधान व्यक्त केले.

Web Title: Show Cause Notice To Officers Who Arrive Late For Work Nitesh Patil

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :belgaumworkerOfficer
go to top