Loksabha 2019 : नगरमधून श्रीपाद छिंदमला केले हद्दपार

वृत्तसंस्था
मंगळवार, 16 एप्रिल 2019

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर नगर शहरातून 262 जणांना हद्दपारीचे आदेश काढले आहेत. यामध्ये श्रीपाद छिंदम याचेही नाव आहे.

नगरः छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान करणारा नगरसेवक श्रीपाद छिंदम याला शहरातून 23 एप्रिलपर्यत हद्दपार करण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर नगर शहरातून 262 जणांना हद्दपारीचे आदेश काढले आहेत. यामध्ये श्रीपाद छिंदम याचेही नाव आहे. शिवाय, त्याचा भाऊ श्रीकांत छिंदम यालाही हद्दपार करण्यात आले आहे. 23 एप्रिलपर्यत 262 जणांना हद्दपार करण्यात आले आहे, अशी माहिती प्रांतअधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी दिली.

तोफखाना पोलिस ठाणे, एमआयडीसी पोलिस ठाणे, कोतवाली पोलिस ठाणे व नगर तालुका पोलिस ठाण्याअंतर्गत येणा-या गुन्हेगारी पार्श्वभुमी असणारांना हद्दपार करण्यात आले आहे. तर 52 जणांना शहरात राहण्याची अटींवर मुभा देण्यात आली आहे.

Web Title: Shripad Chindam Deportation from Nagar city