
तासगाव : ‘‘तालुक्यात गांजा आणि अमली पदार्थ मोठ्या प्रमाणावर विकले जात आहेत. मटका आणि जुगाराचे अड्डे सुरू आहेत, याची पोलिसांना माहिती नसणे शक्य नाही. गुन्हेगार पोलिस गाडीत बसून छापा कुठे टाकायचा, हे सांगत असतील तर काय बोलायचे? ‘व्हॉट्सॲप चॅट’वर मटका सुरू आहे. हे बंद झाले पाहिजे,’’ असा सज्जड दम आमदार रोहित पाटील यांनी पोलिसांना दिला.