sindhudurg : नांगरतासला टस्कराचा धुमाकूळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sindhudurg

Sindhudurg : नांगरतासला टस्कराचा धुमाकूळ

आंबोली : येथील नांगरतास येथे एका टस्कर हत्तीने मोठ्या प्रमाणात धुडगूस घालून नुकसान केले. रात्रभर दहशत घातल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असल्याने त्या हत्तीचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

आंबोली नांगरतास येथे गेले काही दिवस एक मोठा टस्कर दहशत घालत आहे. ऊस तसेच भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहे. त्याचप्रमाणे रात्रीच्या वेळी भररस्त्यात येऊन गाड्यांना अडथळा करीत आहे. त्यामुळे परिसरात भीती आहे. गुरुवारी रात्री साधारण अकराच्या दरम्यान टस्कराने नांगरतास येथे अशोक गावडे व ओंकार गावडे यांच्या घराजवळ आणि तेथील शेतात धुडगूस घातला.

दरवाजावरही सोंडेने थाप मारली. त्यानंतर त्यांची दुचाकी सोंडेने ओढत नेत त्यांच्या टेम्पोवर आपटली आणि दोन्ही गाड्यांचे नुकसान केले. त्यानंतर बराच वेळ उसाचे नुकसान केले. नांगरतास येथील आणखी काहींच्या शेतीचेही नुकसान केले. रात्री या हत्तीने दहशत केल्याने श्री. गावडे यांच्या घरी भीतीचे वातावरण होते. यानंतर रात्री वन विभाग कर्मचाऱ्यांना बोलावल्यावर तासभराने त्या ठिकाणी पोचले. पहाटे चारपर्यंत त्याचा धुडगूस सुरू होता. गेले बरेच दिवस नांगरतास येथे बेळगाव-सावंतवाडी रस्त्यावरही तो दिसत आहे. त्यामुळे कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

Web Title: Sindhudurg Amboli Demand Immediate Settlement Tuskar Dhumakul

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :SindhudurgpolicecarBike