तारदाळ येथील "रावण गॅग" कडून चोरीचा माल जप्त

राजेंद्र होळकर
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

इचलकरंजी - मोटरसायकलीच्या चोऱ्या, घरफोड्या, जबरदस्तीने मोबाईल हॅण्डसेट हिसकावून घेवून पोबारा करणाऱ्या तारदाळ (ता.हातकणंगले) येथील ‘ रावण गॅग ‘ च्या म्होरक्यासह सहा जणाना येथील शहापूर पोलिसानी अटक केली.

इचलकरंजी - मोटरसायकलीच्या चोऱ्या, घरफोड्या, जबरदस्तीने मोबाईल हॅण्डसेट हिसकावून घेवून पोबारा करणाऱ्या तारदाळ (ता.हातकणंगले) येथील ‘ रावण गॅग ‘ च्या म्होरक्यासह सहा जणाना येथील शहापूर पोलिसानी अटक केली.

यामध्ये एका गावामधील पाणी पुरवठा संस्थेचा कर्मचाऱ्यासह एका महाविद्यालयीन तरुण आणि एका अल्पवयीन तरुणाचा समावेश आहे. त्यांच्याकडून चोरीचे वेगवेगळ्या मोबाईल कंपन्याचे २८ हॅण्डसेट, चोरीच्या तीन आणि गुन्ह्यात वापरलेल्या तीन अशा सहा मोटरसायकली, २२ सिमेंट पत्र्याची पाने असा ३ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे, अशी माहिती अप्पर पोलीस अधिक्षक श्रीनिवास घाडगे यांनी पत्रकार बैठकीत दिली. 

अटक केलेल्यामध्ये रावण गॅगचा म्होरक्या सुरज मेहबुब चिक्कोडेसह त्यांचे साथिदार विनायक आनंदा जांभळे, स्वप्नील बाबूराव वराळे, मयुर दीपक कांबळे, सौरभ अशोक मस्के (सर्व रा. तारदाळ , ता.हातकणगंले) याचा समावेश आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता पोलिस कोठडी मिळाली आहे.

श्री.घाडगे म्हणाले, ‘‘ शहापूर पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी संजय हारुगडे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक तानाजी गुरव, कमलेश रजपुत, सुरेश कोरवी, हवालदार शब्बीर बोजगर, इम्तीहाज कोठीवाले, कॉन्स्टेबल अमर कदम, अमर पाटील, गजानग बरगाले, सुनिल बाईत, आबासाहेब चौधर आदीचे पथक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शहापूर-तारदाळ या रोडवर रात्रीची गस्त घालत होते. या पथकांने विना नंबर प्लेटच्या मोटरसायकलवरुन जाणाऱ्या सुरज चिक्कोडे, विनायक जांभळे या दोघांना अडवून. त्यांच्याकडे वाहन चालविण्याच्या परवानासह मोटरसायकलीच्या कागदपत्राविषयी चौकशी केली. त्यावेळी दोघे ही उडवा-उडवीची उत्तरे दिवू लागले. त्यामुळे पोलिसांनी त्यांना पोलिस ठाण्यात आणून कसून चौकशी सुरु केली. या चौकशीमध्ये त्या दोघांनी स्वप्नील वराळे, मयुर कांबळे, सौरभ मस्के, एक अल्पवयीन तरुणाच्या मदतीने मोटरसायकलीच्या चोऱ्या, घरफोड्या, जबरदस्तीने मोबाईल हॅण्डसेट हिसकावून घेवून पोबारा करणारे गुन्हे केल्या माहिती दिली.

त्यावरुन पोलिसांनी वराळे, कांबळे, मस्के या चौघाचा शोध घेवून त्यांना अटक केली. या रावण गॅगकडून त्यांच्याकडून चोरीचे वेगवेगळ्या मोबाईल कंपन्याचे २८ हॅण्डसेट, चोरीच्या तीन आणि गुन्ह्यात वापरलेल्या तीन अशा सहा मोटरसायकली, २२ सिमेंट पत्र्याची पाने असा ३ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याबाबत सांगितले.

‘रावण गॅग‘ कडून जिल्ह्यासह सांगली जिल्ह्यात चोऱ्या

तारदाळ (ता. हातकणंगले) येथील सुरज चिक्कोडे यांने पाच साथिदारांच्या मदतीने ‘रावण नावाची गॅग‘ तयार केली. या गॅगच्या सहा जणानी इचलकरंजीतील गावभाग, शिवाजीनगर, शहापूर, हातकणंगले, जयसिंगपूर, पेठवडगांव, कुरुंदवाड, सांगली शहर या पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये मोटरसायकलीच्या चोऱ्याबरोबर घरफोड्या, जबरदस्तीने मोबाईल हॅण्डसेट हिसकावून घेवून पोबारा करण्याचे गुन्हे केले आहेत.

रावण गॅग पहिल्यादा पोलिसांच्या रेकॉर्डवर

तारदाळ (ता.हातकणंगले) येथील सुरज चिक्कोडेने पाच साथिदारांच्या मदतीने ‘रावण नावाची गॅग‘ तयार केली आहे. ही गॅग पहिल्यांदा पोलिसांच्या रेकॉर्डवर आली आहे. तसेच या गॅग मधील तरुण २१ ते २५ वयोगटातील आहेत. 

Web Title: six arrested from Ravan Gange in Tradal