
सांगली: काँग्रेसचे अकरा वर्षे शहर-जिल्हाध्यक्ष राहिलेल्या पृथ्वीराज पाटील यांनी आज दुपारी भाजपमध्ये प्रवेश केला. त्याआधी त्यांनी पदाचा राजीनामा दिला. ही प्रक्रिया सुरू होण्याआधीच काँग्रेसमध्ये या पदासाठीची शर्यत सुरू झाली आहे. तब्बल सहा मातब्बरांनी या पदासाठी दावा करत शड्डू ठोकला आहे. त्यामुळे आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्यासमोर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नव्या निवडीचे आव्हान उभे राहणार आहे. नव्या चेहऱ्याला संधी, ज्येष्ठाला प्राधान्य की धार्मिक समीकरणातील बेरजेचे राजकारण, विश्वजित-विशाल हे कशाला प्राधान्य देणार, यावर निवड निश्चित होईल.