esakal | 'या' राज्यातून 6 लाख कर्मचारी घरी जाणार
sakal

बोलून बातमी शोधा

Six lakh people registered on the Seva Sindhu portal to return to their state

बंगळूरसह राज्यात विविध उद्योग, रोजगार आणि नोकरीच्या निमित्ताने आलेल्या उत्तर व ईशान्य भारतातील सुमारे सहा लाख लोकांनी आपल्या राज्यात परत जाण्यासाठी सेवा सिंधू पोर्टलवर नोंदणी केली आहे. काही कामगार या आधीच जाऊन आपापल्या राज्यात दाखल झाले असून विविध उद्योगांना कामगारांची टंचाई भासण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

'या' राज्यातून 6 लाख कर्मचारी घरी जाणार

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

बंगळूर: बंगळूरसह राज्यात विविध उद्योग, रोजगार आणि नोकरीच्या निमित्ताने आलेल्या उत्तर व ईशान्य भारतातील सुमारे सहा लाख लोकांनी आपल्या राज्यात परत जाण्यासाठी सेवा सिंधू पोर्टलवर नोंदणी केली आहे. काही कामगार या आधीच जाऊन आपापल्या राज्यात दाखल झाले असून विविध उद्योगांना कामगारांची टंचाई भासण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 

उद्योग, इमारत बांधकाम आणि विविध दुकाने, भांडार, पार्लर, औद्योगिक संस्था पुन्हा सुरू करण्याची तयारी सुरू झाली आहे. केंद्र आणि राज्य सरकार तसेच उद्योजकांनी, कामगारांना नोकरीसाठी परत येण्याचे आवाहन केले आहे, मात्र कामगारांनी परत जाण्यास तयार नाहीत. राज्याच्या औद्योगिक, व्यवसाय आणि बांधकाम क्षेत्रावर त्याचे दीर्घकालीन परिणाम होण्याची चिंता आहे. 

सेवा सिंधू ऍपमध्ये नोंदणीकृत सहा लाखांहून अधिक कामगार मंजुरीच्या आणि प्रवासाच्या व्यवस्थेच्या प्रतीक्षेत आहेत. यामुळे राज्यातील सर्व भागातील कामगारांनी रस्त्याने किंवा रेल्वे रुळावरून चालत जऊ नये, असे आवाहन जिल्हा प्रशासन व पोलिसोनी केले आहे. 
बंगळूर, माल्लूर, म्हैसूर आणि हुबळीसह राज्य रेल्वे स्थानकांमधून विशेष रेल्वेने 1.17 लाखाहून अधिक लोक या आधीच घरी गेले आहेत. रविवारी एकाच दिवसात 12 रेल्वे गाड्यांनी दहा हजाराहून अधिक प्रवासी उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, राजस्थान आणि जम्मू-काश्‍मीरला दाखल झाले. दक्षिण-पश्‍चिम रेल्वेने एकूण 85 श्रमिक गाड्यांची व्यवस्था केली असल्याची माहिती पोलीस आयुक्त भास्कर राव यांनी दिली. 

गावी परत जाण्यासाठी ट्रेनचे तिकिट बुकिंग अद्याप सुरूच आहे. यातील निम्म्या गाड्या उत्तर प्रदेश आणि बिहारला जाणाऱ्या आहेत. बाकीचे झारखंड, ओरिसा आणि बिहारला जाणार आहेत. बंगळूरमधील एकूण सहा लाख लोकांपैकी 3.1 लाख आणि बंगळूर ग्रामीण, कोलार, चिक्कबळ्ळापूर आणि रामनगर ग्रामीण भागातील 70 हजार लोकांनी परतीसाठी नोंदणी केली आहे. 

रोजंदारी कामगारांसाठी विविध विभागातील कर्मचारी दिवसरात्र कार्यरत असल्याचे नोडल अधिकारी मंजूनाथ प्रसाद यांनी सांगितले.