esakal | सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना अजूनही बसपास मिळविण्यासाठी धडपड
sakal

बोलून बातमी शोधा

बसपास

सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना अजूनही बसपास मिळविण्यासाठी धडपड

sakal_logo
By
विनायक जाधव

बेळगाव : सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना अजूनही बसपास मिळविण्यासाठी धडपड करावी लागत आहे. ग्रामीण भागातून येणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी बसपास नसल्यामुळे शाळेला जाणे टाळले आहे. २१ ऑक्टोबरपासून पहिली ते पाचवी पर्यंतचे वर्गही सुरू करण्याचा शासनाचा विचार आहे. त्यामुळे बसपास मिळविण्यासाठी आणखी अर्ज वाढणार आहेत.

बेळगाव परिवहन विभागात ७६ हजार बसपासधारक विद्यार्थी आहेत. सद्या सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना बसपास वितरित केले जात आहे. २१ ऑक्टोबरपासून पहिली ते पाचवीचे वर्ग सुरू झाल्यास त्या विद्यार्थ्यांना देखील बसपास तातडीने द्यावे लागणार आहेत. सप्टेंबर।महिन्यात सहा हजार बसपासचे वितरण बेळगाव विभागातून करण्यात आले होते. चालू महिन्यात ही संख्या चार हजार इतकी असून आतापर्यंत केवळ दहा हजार विद्यार्थ्यांना बसपास वितरित करण्यात आले आहेत. चालू महिन्यात पदवी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा आसल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना देखील बसपासची मुदत वाढवून देण्यात आली.

हेही वाचा: अटलजींच्या भाषणाची क्लीप शेअर करत वरूण गांधींचा भाजपला घरचा आहेर

त्या कामात देखील परिवहन बसपास वितरण केंद्रातील कर्मचारी व्यस्त होते. त्यामुळे सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना बसपास वितरण करण्यात वेळ झाला. त्यासाठी दसरा सुट्टीतही परिवहनकडून बसपास वितरण कार्य सुरूच ठेवण्यात आले आहे. पम तरी देखील विद्यार्थ्यांना वेळेत बसपास मिळणे अवघड ठरले असून अनेकांना शाळा सुरू होऊन दीड महिना उलटला असला तरी अद्याप बसपास मिळालेले नाही.

"काही शाळांकडूनही बसपासचे एकत्रित अर्ज आणून देण्यास विलंब होत आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना बसपास मिळालेले नाहीत. बसपास वितरण करण्यासाठी संगणक आणि मनुष्यबळ देखील वाढविण्यात आले असून अर्ज दाखल होताच तातडीने त्यानुसार बसपास तयार करून संबंधीत शाळांकडे ते सुपूर्द केले जात आहेत."

-के. के. लमाणी, परिवहन नियंत्रण अधिकारी

loading image
go to top