या शेतकऱ्यांने केली कमी जागेत लागवड पण बंपर उत्पादन कसे मिळवले वाचा....

मिलिंद देसाई
Tuesday, 19 May 2020

कमी जागा आहे त्यामुळे काहीच करता येत नाही असे अनेकांकडुन नेहमीच ऐकावयास मिळते मात्र

बेळगाव  : कमी जागा आहे त्यामुळे काहीच करता येत नाही असे अनेकांकडुन नेहमीच ऐकावयास मिळते मात्र आवड असल्यास कमी जागेतही चांगल्या प्रकारे शेती करता येते हे कणबर्गी येथील एका कुटुंबाने दाखवुन दिले असुन 14 गुंठे एकर जमिनीत विविध प्रकारच्या पेरुची झाडे लावून भरघोस उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. घराशेजारी जागा आणि घरापासुन जवळ असलेल्या जागेत लावण्यात आलेली पेरुची झाडे फळांनी भरुन गेली आहेत. त्यामुळे त्यांना वर्षभर उत्पादन मिळु लागले असुन इतर लोकांनीही जागेचा सदुपयोग केल्यास शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळु शकते. 

कणबर्गी येथील अर्जुन रामा मुचंडीकर यांनी आपल्या कडे कमी जागा आहे म्हणुन गप्प न बसता जागा मिळेल त्या ठिकाणी झाडे लावण्याचा छंद जोपासला असुन फलटन, बारामती, धारवाड आदी भागात आयोजित केल्या जाणाऱ्या फळ प्रदर्शन पाहिल्यानंतर कमी जागेत पेरुची झाडे लावता येतात हे दिसुन आल्यानंतर त्यांनी आपल्या घराशेजारी असणाऱ्या 7 गुंठे व घरापासुन जवळच असलेल्या 7 गुंठे जागेत पेरुच्या झाडांची लागवड केली आहे. पाच फुट अंतरावर एक झाड लावण्यात आले असुन किड निर्माण होऊ नये यासाठी लसुनच्या टरपलांचा वापर केला जातो तसेच सर्व झाडांना सेंद्रीय खत घातले जाते.

हेही वाचा- गोव्याहून गुजरातच्या दिशेने चालू होती दारू वाहतुक ; पोलिसांनी केली तपासणी तर... -

पेरु बागेतून महिना हजारोंचे उत्पन्न

त्यामुळे वर्षभर पेरुची लागवड होत असुन सांयकाळी बागेतील पेरु घरासमोर विक्रीसाठी ठेवला जातो. यामुळे गावातील नागरीकांसह महामार्गावरुन जाणारे लोक खरेदीसाठी गर्दी करीत असतात. बाजारात 100 रुपये किलोने विक्री होणारे पेरु मापक दारात उपलब्ध करुन देण्यावर मुचंडीकर कुटुबांने भर दिला आहे. 14 गुंठेत जागेत पेरुची झाडे लावण्याबरोबरच 40 नारळाची झाडांसह आंबा, फणस व इतर प्रकारची झाडे लावण्यात लावुन मुचंडीकर यांनी इतर शेतकऱ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. यापासुन धडा घेत इतर शेतकऱ्यांनीही कमी जागेत घरघोस उत्पादन घेणे आवश्‍यक आहे. 

हेही वाचा- दिलासादायक बातमी ; कोल्हापूर ऑरेंज झोनमध्येच

वडीलांना विविध प्रकारची झाडे लावुन त्याचे संवर्धन करण्याची आवड आहे. त्यापासुन प्रेरणा घेत पेरुची बाग तयार केली असुन दररोज घरासमोर बसुन पेरुची विक्री केली जाते. त्यामुळे चांगले उत्पादन मिळत असुन शेतकऱ्यांनी पारंपारीक शेतीबरोबरच फळांची लागवड केली तर त्यांची आर्थिक स्थिती सुधारु शकते. 
सिध्देश मुचंडीकर, कणबर्गी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: small farming but bumper money in belgaum