वाढदिवसाला कापला चक्क ३७ किलोचा केक.... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Smarjit Ghatge Birthday Celebration In Kagal Kolhapur Marathi News

सकाळी शुभेच्छा स्विकारण्यापूर्वी समरजितसिंह घाटगे यांनी देवाचे दर्शन घेतले.

वाढदिवसाला कापला चक्क ३७ किलोचा केक....

कागल (कोल्हापूर) : शाहू उद्योगसमूहाचे अध्यक्ष व भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष  समरजितसिंह घाटगे यांचा ३७ वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला. म्हाकवेच्या संदीप कांबळे व सहकाऱ्यांनी आणलेला ३७ किलोचा केक श्री. घाटगे यांच्या हस्ते कापण्यात आला. या वेळी विवेक कुलकर्णी व सौ. नम्रता कुलकर्णी यांच्याकडून दोन हजार कंपास भेट देण्यात आल्या. या वेळी चार सुवर्णपदके पटकावणाऱ्या धावपटू सौ. अनिता जयवंत पाटील (उचगाव) यांचा सत्कार करण्यात आला.

म्हाकवेच्या संदीप  व सहकाऱ्यांनी आणला केक
सकाळी शुभेच्छा स्विकारण्यापूर्वी समरजितसिंह घाटगे यांनी आडीचे परमात्मराज राजीवजी महाराज, हत्तरगी मठाचे आनंद गोस्वामी महाराज तसेच गडहिंग्लज येथील काळभैरी देवाचे दर्शन घेतले. त्यानंतर गडहिंग्लज येथे १२ ते ३ शूभेच्छा स्विकारल्या. त्यानंतर सायंकाळी५ वाजता जयसिंगराव घाटगे भवनजवळील छत्रपती शाहु महाराज, स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले व शुभेच्छा स्वीकारल्या

हेही वाचा- वयाच्या पंचाहत्तरीत ही म्हादूमामाचा हा संर्घष
 

उपस्थित मान्यवर
राजे समरजित्नसिंह घाटगे यांचा वाढदिवस व त्यांची  भाजपा जिल्हा अध्यक्षपदी झालेली निवड याचे औचित्य साधून संपूर्ण कागलमध्ये मोठ्या प्रमाणात अभिनंदनाचे व वाढदिवसाच्या शुभेच्छा फलक लावण्यात आल्याने संपूर्ण कागल शहर राजेमय 
झाले होते.या शुभेच्छा देण्यासाठी प्रमुख उपस्थित म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, करवीरचे आमदार पी.एन.पाटील, ‘गोकुळ’चे  संचालक रणजितसिंह पाटील, बिद्री संचालक बाबासाहेब पाटील, गोकुळ संचालक बाळासाहेब खाडे, भूषण पाटील, राहुल देसाई, विजयराव भोसले, भाजपा संघटक बाबा देसाई, माजी अध्यक्ष हिंदुराव शेळके, डॉ. अनिल पाटील, माजी महापौर सुनील कदम, मेट्रो हायटेकचे भरत पाटील, मॅंकचे अध्यक्ष धोत्रे व सहकारी, पंकज पाटील,

नगरसेविका लक्ष्मी सावंत, दिपाली भुर्ले, संदीप भुर्ले, मयुर उद्योगाचे चेअरमन डॉ. संजय पाटील, सुशांत पाटील, शशिकांत पाटील, संजय शहा,शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भगवान काटे, शिक्षक संघ अध्यक्ष  जयवंत पाटील, कास्ट्राईबचे अध्यक्ष रमेश कांबळे, चेअरमन राजू सावर्डेकर, पंचायत समितीच्या माजी सदस्या उल्का तेलवेकर, सदस्य रमेश चौगले, भाजप भुदरगड तालुकाध्यक्ष   परुळेकर, देवराज बारदेस्कर, शिवाजी गिरीबुवा,धरणग्रस्त नेते बाबुराव पाटील, भोगावती माजी व्हा.चेअरमन हंबीरराव पाटील, नामदेवराव पाटील यासह असंख्य कार्यकर्ते, महिला, बालचमू गर्दी केली होती.