वयाच्या पंचाहत्तरीत ही म्हादूमामाचा 'हा' संर्घष

Seventy-five years Age Person Doing Milk Seller Kolhapur Marathi News
Seventy-five years Age Person Doing Milk Seller Kolhapur Marathi News

बालिंगा (कोल्हापूर) : घरची परिस्थिती बेताची, लहान वयातच शिक्षण सुटले आणि घराला आर्थिक हातभार लावण्यासाठी गवळी धंदा करण्याचे ठरविले. गेली ६० वर्षे अविरतपणे हा व्यवसाय ऊन, वारा आणि पाऊस याची तमा न बाळगता सुरू आहे. कोल्हापूर शहरातील नागरिकांना न थकता दूधाचा रतीब सुरू आहे. या ‘गवळी मामा’चे नाव आहे, महादेव जोती पाटील. कोगे (ता. करवीर) येथील महादेव पाटील हे ‘म्हादू गवळी’ या नावाने सर्वांना परिचित आहेत.

सकाळी ग्राहकांकडून दूध संकलन केल्यानंतर नऊ वाजता सायकलींवरून म्हादू गवळी कोल्हापूर शहरासह आणि फुलेवाडी परिसरात दुधाचा रतीब घालतात. ६० वर्षे न चुकता हा त्यांचा दिनक्रम आजही कायम आहे. पावसाळ्यातही वाटेवर पाणी आले तरी म्हादू गवळी पोहत जाऊन दूधाचा पुरवठा आपल्या ग्राहकांना करतात. त्याला त्यांचा मुलगा रूपेश याचीही सध्या मोलाची साथ मिळत आहे.

दुध विक्रीतून उभारला संसार

तुटपुंजी जमीन आणि केवळ दूध धंद्याच्या जोरावर म्हादू गवळी यांनी मुलगा आणि तीन मुलींना शिक्षण दिले आहे. केवळ दुधाच्या मिळकतीवर त्यांनी तीन मुलींची लग्ने केली असून त्यांना संसारात स्थिर आहे. मुलगा रूपेशनेही पदवीपर्यंत शिक्षण घेतले आहे. तो एका चांगल्या कंपनीत नोकरीला आहे.  केवळ परिस्थितीला घाबरून अनेक जण पळ काढतात; पण म्हादू गवळी यांनी केवळ जिद्दीच्या जोरावर व्यवसायात आर्थिक स्थिरता मिळवली.

 
म्हादूमामाची प्रतिक्षा ग्राहकांना  

सध्या त्यांचे वय ७५ आहे. तरीही आपल्या ग्राहकांची ते अडचण होऊ देत नाहीत. त्यांच्याकडील दूध घेतल्याशिवाय ग्राहकांना समाधान मिळत नाही. रोज ग्राहक त्यांची वाटच पाहत असतात. ऊसपट्ट्यातील दुधाचा रतीब असल्याने त्याचा गोडवा ग्राहकांना सुखावणारा आहे. शरीर साथ देईल, तोपर्यंत आपला व्यवसाय सुरूच ठेवणार असल्याचे, म्हादू गवळी सांगतात.

 कामातून समाधान मिऴते

ग्राहकांना समाधान देऊ शकल्याने मी आनंदी आहे. कोणताही धंदा प्रामाणिकपणे आणि सचोटीने केल्यास त्यात नक्कीच यश मिळते. केवळ दूध धंद्याच्या जोरावरच मी आर्थिक स्तर उंचावू शकलो, याचा मला अभिमान आहे.
- महादेव पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com