शाब्बास! मनाने खंबीर असलेल्या ट्रक चालकाच्या मुलीने केले कळसुबाई शिखर सर

smita bhasme kalasubai peak cover in she handicap in sangli
smita bhasme kalasubai peak cover in she handicap in sangli
Updated on

शिराळा : येथील स्वाती भस्मे या दिव्यांग तरूणीने महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई सर करून आम्ही शरीराने कमजोर असलो तरी मनाने खंबीर व सुदृढ असल्याचे सिद्ध करून दाखवले आहे. हे शिखर सर करणारी स्वाती शिराळा तालुक्‍यातील पहिली महिला आहे. ट्रक चालकाच्या मुलीच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

औरंगाबाद येथील शिवऊर्जा प्रतिष्ठानने दिव्यांगांसाठी कळसुबाई शिखर सर करणारी मोहीम राबवली होती. राज्यातील 70 तर सांगली जिल्ह्यातील 11 दिव्यांग व्यक्तींनी हे शिखर सर केले. शिराळा तालुक्‍यातील स्वाती ही एकमेव आहे. तीला सुदेश माने आणि भगवान भंडारे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. स्वाती लहानपणापासूनच अस्थिव्यंग आहे. तरीसुद्धा तीने तिने 18 व्या राष्ट्रीय पॅरा अथलेटिक स्पर्धेत गोळा फेक आणि थाळीफेक या क्रीडा प्रकारात दोन कास्य पदके पटकावली आहेत.

शिवाय देशातील पहिल्या अपंग महिला क्रिकेट संघात तिचा समावेश होता. विश्वासराव नाईक महाविद्यालयातून तीने पदवीपर्यंत चे शिक्षण पूर्ण केले आहे. दिव्यांग असलेली स्वाती 28 वर्षांची असून, तिचे वडील बाळासाहेब भस्मे हे ट्रक चालक आहेत. आई गृहिणी आहे. दोन विवाहित बहिणी असून एक लहान भाऊ आहे. तिच्या या कार्याबद्दल कुटुंबाचा सतत पाठिंबा असतो. 

"एकाग्रता, आत्मविश्वास ,सकारात्मक विचार आणि सतत नवे शिकण्याची इच्छा ही स्वातीची बलस्थाने आहेत. ती म्हणते, "आपल्या क्षमतेपेक्षा मोठ्या यशाची स्वप्ने बघितल्याने आज मला कळसुबाई शिखर सर करता आले."

- स्वाती भस्मे 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com