Kadegaon: मॉर्निंग वॉकला गेलेल्या वृद्ध महिलेचे मंगळसूत्र चोरट्यांनी पळवले; गळ्यातील मंगळसूत्रला हिसडा मारुन टाेकल धूम..

वृद्ध महिलेच्या गळ्यातील २ लाख २ हजार रुपये किमतीचे १८ ग्रॅम ५०० मिलिगॅम वजनाचे सोन्याचे मिनी मंगळसूत्र अज्ञात चोरट्यानी हिसडा मारुन पळवल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी सकाळी सहा वाजता घडली.
Bike-borne thieves snatch mangalsutra from elderly woman during morning walk; case registered.
Bike-borne thieves snatch mangalsutra from elderly woman during morning walk; case registered.Sakal
Updated on

कडेगाव : हिंगणगाव बुद्रुक (ता. कडेगाव) येथे मॉर्निंग वॉकला गेलेल्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील २ लाख २ हजार रुपये किमतीचे १८ ग्रॅम ५०० मिलिगॅम वजनाचे सोन्याचे मिनी मंगळसूत्र अज्ञात चोरट्यानी हिसडा मारुन पळवल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी (ता. २१) सकाळी सहा वाजता येथे कडेपूर-पुसेसावळी रस्त्यावर मंदिराजवळ घडली. याबाबत पार्वती श्रीरंग कदम (वय ७२, रा. हिंगणगाव बुद्रुक) यांनी कडेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com