सोशल डिस्टसिंगला जिल्हाधिकाऱ्यांकडून "हरताळ'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 एप्रिल 2020

फटाक्‍यांची आतषबाजी, जल्लोष आणि मोठी गर्दी केल्याचेही दिसून आले. यामुळे सोशल डिस्टसिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसत असतानाच यामध्ये बेळगावचे जिल्हाधिकारी एस. बी. बोम्मनहळ्ळी आणि अन्य अधिकाऱ्यांची भर पडली

बेळगावः  कोरोनाव्हायरस विरोधातील लढ्यासाठी दिवे लावण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देताना जिल्हाधिकाऱ्यांसह तत्सम अधिकाऱ्यांनी सोशल डिस्टसिंगचे नियमाला हरताळ फासण्यात आला. या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे सोशल मीडियावर नेटिजन्सकडून प्रचंड टीका करण्यात आली.

देशात कोरोना बांधीतांची संख्या वाढत असल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. नागरिकांमध्ये आत्मविश्‍वास वाढविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवे लावण्याचे आवाहन केले होते. यानंतर देशभरातून रविवारी मोठा प्रतिसाद मिळाला पण, ते करताना अनेकांनी नियम पाळले नाहीन. फटाक्‍यांची आतषबाजी, जल्लोष आणि मोठी गर्दी केल्याचेही दिसून आले. यामुळे सोशल डिस्टसिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसत असतानाच यामध्ये बेळगावचे जिल्हाधिकारी एस. बी. बोम्मनहळ्ळी आणि अन्य अधिकाऱ्यांची भर पडली.

रविवारी रात्री नऊ वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमात कोणत्याही अधिकाऱ्यांकडून सोशल डिस्टसिंग पाळण्यात आला नाही. जिल्हाधिकारी कार्यालय आवारात आयोजित कार्यक्रमाला पोलीस आयुक्त एस. बी. लोकेशकुमार, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र के. व्ही., जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी, जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डी. एम. मुन्याळ, बुडा आयुक्त प्रीतम नसलापुरे आदींसह सहाय्यक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. पण, एकाही अधिकाऱ्यांनी सोशल डिस्टसिंग पाळले नाही. कोरोना संसर्गचा प्रभाव कमी करण्यासाठी किमान सहा फूट अंतर दोन व्यक्तीत हवे, असे अधिकारी नियमित सांगतात. पण, जिल्हा प्रशासनाला त्याचा विसर पडल्याचे यातून स्पष्ट झाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Social disasters harassed collectors belgaum