VIDEO : शेणाने सारवलेल्या गाडीतून मुलीची पाठवणी; हेतू काय ? जरूर वाचा

संभाजी थोरात, सचिन सावंत
शनिवार, 14 डिसेंबर 2019

दुधाळ हे मुळचे उस्मानाबाद जिल्ह्यातील. साहजिकच कमी पावसाचा प्रदेश असल्याने पाण्याचे महत्त्व त्यांना आहेच. तसेच उन्हाळ्यातील असह्य उकाड्याचाही त्यांना अनुभव आहे. पर्यावरण संवर्धनासाठी देशी गायीचे महत्त्व यामुळेच त्यांनी अभ्यासले.

कोल्हापूर - लग्न म्हणजे खर्च...लग्न म्हणजे जल्लोष..अस चित्र डोळ्यासमोर येत..मात्र लग्नातून सामाजिक संदेश दिला जाऊ शकतो हे दाखवून दिलंय कोल्हापूरमध्ये एका कुटुंबान.  अनेकजण लग्नात मुलीची विदाई फुलांनी सजवलेल्या पालखीतून करतात.  हौशी मुलीचा बाप आपल्या लाडक्या मुलीची विदाई हेलिकॉप्टर मधून करतो. असे हटके प्रकार अनेकदा आपणास पाहायला मिळतात. पण कोल्हापुरात एका बापानं आपल्या लाडक्या मुलीची विदाई शेणाने लेप दिलेल्या मोटारीमधून केली. यातून त्यांनी जनतेला संदेशही दिला आहे. ग्लोबल वार्मिंगचा धोका लक्षात घेऊन शेणाचे महत्व किती आहे. हे पटवून देण्यासाठी आणि समाज प्रबोधन करण्यासाठी डॉ. नवनाथ दुधाळ यांनी अशा प्रकारे गाडीची सजावट केली. 

दुधाळ हे मुळचे उस्मानाबाद जिल्ह्यातील. साहजिकच कमी पावसाचा प्रदेश असल्याने पाण्याचे महत्त्व त्यांना आहेच. तसेच उन्हाळ्यातील असह्य उकाड्याचाही त्यांना अनुभव आहे. पर्यावरण संवर्धनासाठी देशी गायीचे महत्त्व यामुळेच त्यांनी अभ्यासले. देशी गायीच्या शेणाचे महत्त्व जाणून घेऊन कृतीतून ते याबाबत प्रबोधनाचे काम करतात. याच उद्देशाने त्यांनी मुलीच्या लग्नात प्रबोधनाच्या हेतूने हा अनोखा उपक्रम राबविला. दुधाळ यांच्या मुलीचा लग्नसोहळा कोल्हापुरातील सोळंकी कुटुंबात झाला. यावेळी त्यांनी मुलीला चक्क शेणाने सजवलेल्या गाडीतून लग्न मंडपात आणले.  

हेही वाचा - होय, तरुणी - महिलांसाठी पोलिस आहेत सतर्क; कशावरुन ? 

शेणाचे महत्त्व...

ग्लोबल वार्मिगचा धोका लक्षात घेऊन पर्यावरण संवर्धनासाठी देशी गायीचे महत्त्व जाणून घेणे गरजेचे आहे. याबाबत समाज प्रबोधन करण्यासाठी मी हा उपक्रम राबविला. गाडीला शेण लावल्यामुळे गाडीचे तापमान कमी होते. शिवाय शेणामुळे मोबाईलच्या रेडिशनपासून बचाव होतो. गाडी धुण्यासाठी रोज तीन बादल्या पाणी लागते. हे पाणी या उपक्रमामुळे आपण वाचवू शकतो. मराठवाडा हा दुष्काळी पट्टा आहे. तेथे आम्ही पाणी वाचविण्याचा प्रयत्न करतो आहे. पाणी वाचवा, पर्यावरणाचे संवर्धन करा हा संदेश मला या अनोख्या लग्नाच्या माध्यमातून द्यायचा आहे. 
- डॉ. नवनाथ दुधाळ 

हेही वाचा - कुणाला हृदय द्यायचे आहे का ? यांना आहे गरज 

नवऱ्याकडील मंडळीकडूनही काैतुक

डाॅ. दुधाळ यांच्या या अनोख्या उपक्रमाचे त्याची मुलगी निकितासह नवऱ्याकडील मंडळींनी देखील काैतुक केले. तापमान वाढीत शेणाचे महत्व पटवून देण्याचा छोटासा प्रयत्न डॉ. दुधाळ यांनी मुलीच्या लग्नातून केला. निरोगी आणि पर्यावरण पूरक आयुष्य जगण्याचा संदेश देत त्यांनी लेकीची बिदाई केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Social Message On Importance Of Cow Dung Given Trough Daughter Marriage