Sangli News:'समाजसेवक बन्सीलाल कदम यांचा बैलाच्या धडकेत मृत्यू'; मोकाट जनावरांच्या उपद्रवाबाबत पालिकेचे दुर्लक्ष

Tragic Death of Kadam: १६ जुलैला सकाळी जनावरांच्या झुंडीतील एका बैलाने हल्ला केला. बैलाला हटकल्याचे निमित्त झाले. बैलाने त्यांच्यावर हल्ला करीत उचलून फेकून दिले. गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
Locals gather at the site where social worker Kadam lost his life in a tragic bull attack; questions raised over civic inaction.
Locals gather at the site where social worker Kadam lost his life in a tragic bull attack; questions raised over civic inaction.Sakal
Updated on

सांगली : मोकाट बैलाने धडक दिल्याने जखमी झालेले येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बन्सीलाल तुकाराम कदम (वय ७५) यांचा उपचार सुरू असताना आज मृत्यू झाला. गेल्या १६ जुलैपासून त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. मोकाट जनावरांच्या उपद्रवाबाबत पालिकेच्या दुर्लक्षाचा जबर फटका कदम कुटुंबीयांना भोगावा लागला. गुरुवारी सकाळी सात वाजता अमरधाम स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून, मुली असा परिवार आहे. हिंदू एकता आंदोलनचे संस्थापक दिवंगत नारायणराव कदम यांचे ते कनिष्ठ बंधू होत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com