शहरात पुन्हा 96 पॉझिटिव्ह! आज 36 वर्षीय पुरुषासह चौघांचा कोरोनाने घेतला बळी 

तात्या लांडगे
Saturday, 25 July 2020

ठळक बाबी... 

 • शहरातील 25 हजार 194 व्यक्‍तींची झाली कोरोना टेस्ट 
 • आतापर्यंत शहरातील चार हजार 401 व्यक्‍तींना झाली कोरोनाची लागण 
 • शहरातील 222 पुरुषांचा तर 120 महिलांचा कोरोनाने घेतला बळी 
 • आतापर्यंत एक हजार 648 पुरुषांनी व एक हजार 150 महिलांनी केली कोरोनावर मात 
 • शहरातील 759 पुरुष आणि 502 महिलांवर सुरु आहेत रुग्णालयांमध्ये उपचार 
 • स्वामी विवेकानंद नगर, व्यंकटेशन नगर, गांधी नगर व स्वागत नगरात प्रत्येकी एकाचा कोरोनामुळे मृत्यू 

सोलापूर : शहरातील एकूण 25 हजार 194 व्यक्‍तींची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. त्यामध्ये आतापर्यंत चार हजार 401 व्यक्‍तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. आतापर्यंत शहरातील 442 व्यक्‍तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आज 36 वर्षीय पुरुषासह चौघांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये होटगी रोडवरील स्वामी विवेकानंद नगरातील 72 वर्षीय पुरुषाचा, अक्‍कलकोट रोडवरील व्यंकटेश नगरातील 70 वर्षीय महिलेचा, स्वागत नगरातील 70 वर्षीय महिलेचा, तर लष्कर परिसरातील गांधी नगरातील 36 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. 

 

सिध्देश्‍वर नगर, शंकर नगर, साई नगर (होटगी रोड), प्रताप नगर, मिल्लत नगर, द्वारका नगरी, दोंदे नगर, हरेकृष्ण अपार्टमेंट, मंत्री चंडक अपार्टमेंट (विजयपूर रोड), श्रीशैल नगर मंत्री चंडक (भवानी पेठ), पी. जी. हॉस्टेल (सिव्हिल हॉस्पिटल), कोळी समाज सोसायटी, दक्षिण सदर बझार, सेटलमेंट कॉलनी क्रं. दोन, मोदी खाना, एल.व्ही. चाळ, सहयोग नगर, शिवदारे कॉलेजजवळ, नरसिंग नगर, गणेश नगर (जुळे सोलापूर), मित्र नगर, जवाहर नगर, सदगुरु सोसायटी, महालक्ष्मी सोसायटी, मेहताब नगर (शेळगी), पश्‍चिम मंगळवार पेठ, तेलंगी पाच्छा पेठ, स्वामी विवेकानंद नगर, मल्लिकार्जुन नगर, (हत्तुरे वस्ती), एकता नगर, मुरारजी पेठ, राहूल नगर, खडक गल्ली (बाळे), एन.जी.मिल चाळ, उमानगरी, गुरुछाया अपार्टमेंट, गणेश नगर (पुना रोड), बेनू नगर (आटीओ कार्यालयाजवळ), एमआयडीसी, व्यंकटेश नगर, वेदांत नगर (अक्‍कलकोट रोड), निर्मय अपार्टमेंट, साई सुगंध अपार्टमेंट (रेल्वे लाईन), गीता नगर (न्यू पाच्छा पेठ), रविवार पेठ, योगेश्‍वर नगर, सिध्दीविनायक रेसिडेन्सी (दमाणी नगर), सहारा नगर, बजरंग नगर (मजरेवाडी), मड्डी वस्ती (कुमठे), सोमवार पेठ, विडी घरकूल, कमलश्री अपार्टमेंट, पद्मशाली चौक, मुरारजी पेठ, विजय नगर (नई जिदंगी) याठिकाणी आज नव्या रुग्णांची भर पडली आहे. 

ठळक बाबी... 

 • शहरातील 25 हजार 194 व्यक्‍तींची झाली कोरोना टेस्ट 
 • आतापर्यंत शहरातील चार हजार 401 व्यक्‍तींना झाली कोरोनाची लागण 
 • शहरातील 222 पुरुषांचा तर 120 महिलांचा कोरोनाने घेतला बळी 
 • आतापर्यंत एक हजार 648 पुरुषांनी व एक हजार 150 महिलांनी केली कोरोनावर मात 
 • शहरातील 759 पुरुष आणि 502 महिलांवर सुरु आहेत रुग्णालयांमध्ये उपचार 
 • स्वामी विवेकानंद नगर, व्यंकटेशन नगर, गांधी नगर व स्वागत नगरात प्रत्येकी एकाचा कोरोनामुळे मृत्यू 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: solapur city again 96 positive Corona killed four people including a 36-year-old man today