esakal | VidhanSabha 2019:  निवडणूक खर्चामध्ये प्रणिती शिंदे आहे 'या' क्रमांकावर 
sakal

बोलून बातमी शोधा

praniti-shinde

सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील 20 उमेदवारांनी गेल्या 2 ते 11 ऑक्‍टोबर या कालावधीत केलेला खर्च निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केला आहे.

VidhanSabha 2019:  निवडणूक खर्चामध्ये प्रणिती शिंदे आहे 'या' क्रमांकावर 

sakal_logo
By
विजयकुमार सोनवणे

विधानसभा 2019  
सोलापूर - सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील 20 उमेदवारांनी गेल्या 2 ते 11 ऑक्‍टोबर या कालावधीत केलेला खर्च निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. त्यानुसार शिवसेनेचे उमेदवार दिलीप माने खर्चात आघाडीवर असून, एमआयएमचे फारूख शाब्दी, माकपचे नरसय्या आडम आणि कॉंग्रेसच्या प्रणिती शिंदे अनुक्रमे दुसऱ्या ते चौथ्या क्रमांकावर आहेत. 

अपक्ष उमेदवार महेश कोठे यांनी 11 ऑक्‍टोबरपर्यंत फक्त 77 हजार 300 रुपयांचा खर्च सादर केला आहे. त्यांनी दाखविलेला खर्च आणि शासकीय यंत्रणेने निश्‍चित केलेला खर्च यामध्ये मोठा फरक आढळून आला आहे. पाचव्या क्रमांकावर वंचित बहुजन आघाडीचे इम्तियाज पिरजादे यांचा क्रमांक असून त्यांनी आतापर्यंत 93 हजार 849 रुपयांचा खर्च सादर केला आहे. विक्रम कसबे या अपक्ष उमेदवाराने सर्वात कमी 5330 रुपये खर्च सादर केला आहे. 

उमेदवार, पक्ष व कंसात खर्च रुपयांत या प्रमाणे -

दिलीप माने - शिवसेना (5,66,234),
फारूख शाब्दी -एमआयएम (3,58,180), 
नरसय्या आडम - माकप ( 3,05,005),
प्रणिती शिंदे - कॉंग्रेस (2,23,890),
इम्तियाज पीरजादे - वंचित बहुजन आघाडी (93,849), 
बशीर शेख - लेबर पार्टी (84,660),
महेश कोठे - अपक्ष (77,300),
राहूल सर्वगोड- बसप (50,468),
कल्याणी हलसंगी -अपक्ष (17854), 
राजेंद्र रंगरेज -अपक्ष (13,645),
नागमणी जक्कन - अपक्ष (13,315),
अशोक मांचन - अपक्ष (13060), 
गौस कुरेशी -हिंदुस्थान जनता पार्टी (12,700),
विजय करपेकर - अपक्ष (12,150),
महेश गायकवाड - अपक्ष (12,100), 
खतीब वकील - आम आदमी पार्टी (10,100),
विजय आबुटे - बहुजन व्ही ए (10,070),
दीपक गवळी - अपक्ष (7140), 
सचिन मस्के -अपक्ष (5,700) आणि
विक्रम कसबे - अपक्ष (5330) 

खर्चात तफावत ; कोठे, आडम यांना नोटीस 
उमेदवाराने दिलेला खर्च आणि शासकीय यंत्रणेचा खर्च यामध्ये तफावत आढळल्याने माकपचे नरसय्या आडम आणि अपक्ष महेश कोठे यांना नोटीस बजावण्यात आली आहे. श्री. आडम यांनी 3 लाख पाच हजार पाच रुपये खर्च दाखविला आहे. शासकीय यंत्रणेने हा खर्च 3 लाख 38 हजार 828 इतका निश्‍चित केल्याने 33 हजार 823 रुपयांचा फरक आढळला आहे. तर श्री. कोठे यांनी 77 हजार 300 रुपयांचा खर्च दाखवला आहे. शासकीय यंत्रणेने हा खर्च 2 लाख 9 हजार 890 रुपये निश्‍चित केल्याने 1 लाख 32 हजार 590 रुपयांचा फरक आढळला आहे. या प्रकरणी या दोघांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. 

loading image
go to top