सोलापूर जिल्ह्यात पंचायत समित्यांसाठी असे आहे आरक्षण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

सोलापूर जिल्ह्यातील ११ पंचायत समितीच्या सभापतीचा कार्यकाळ संपुष्टात या असल्याने आज आरक्षण जाहीर झाले. यात कोणत्या ठिकाणी कोणाला आरक्षण सुटणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.  राज्यात काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी यांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केल्याने आता पंचायत समित्यामध्ये त्याचा परिणाम होणार का हे पाहावे लागतणार आहे.

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ११ पंचायत समितीच्या सभापतीपदाची आरक्षण सोडत मंगळवारी (ता. १०) जाहीर झाली आहे. यामध्ये सहा पंचायत समित्याच्या सभापतीपदासाठी सर्वसाधारण आरक्षण आहे. तर तीन ठिकाणी नागरिकाचा मागास प्रवर्गासाठी आरक्षण आहे. याशिवाद दोन ठिकाणी अनुसुचित जातीसाठी आरक्षण पडले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील ११ पंचायत समितीच्या सभापतीचा कार्यकाळ संपुष्टात या असल्याने आज आरक्षण जाहीर झाले. यात कोणत्या ठिकाणी कोणाला आरक्षण सुटणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.  राज्यात काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी यांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केल्याने आता पंचायत समित्यामध्ये त्याचा परिणाम होणार का हे पाहावे लागतणार आहे.

जिल्ह्यातील तालुकानिहाय सभापतीपदाचे आरक्षण
१) माळशिरस पंचायत समितीसाठी अनुसुचित जाती महिला २) अक्कलकोट पंचायत समितीसाठी अनुसुचित जाती सर्वसाधारण ३) पंढरपूर पंचायत समितीसाठी नागरिकाचा मागास प्रवर्ग महिला ४) उत्तर सोलापूर पंचायत समिती सर्वसाधारण ५) मंगळवेढा पंचायत समिती सर्वसाधारण महिला ६) मोहोळ पंचायत समितीसाठी सर्वसाधारण महिला ७) सांगोला पंचायत समितीसाठी सर्वसाधारण महिला ८) करमाळा पंचायत समितीसाठी सर्वसाधारण ९) दक्षिण सोलापूर सोलापूर पंचायत समितीसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला १०) माढा पंचायत समितीसाठी नागरीकाचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण ११) बार्शी पंचायत समितीसाठी सर्वसाधारण याप्रमाणे आरक्षण जाहीर झाले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solapur district Reservation for Panchayat Samitis