सोलापूरला मिळाले नवे पालकमंत्री अन्‌ जिल्हाधिकारी 

सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 16 जानेवारी 2020

सोलापूर : शिवसेना-राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या सरकारमध्ये सोलापूरच्या पालकमंत्रिपदाचा जबाबदारी राज्याचे कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यावर सोपविण्यात आली आहे. वळसे-पाटील यांची नियुक्ती झाल्यापासून अद्याप त्यांचा सोलापूर दौरा झाला नाही. नवीन पालकमंत्री सोलापूरला येण्यापूर्वीच सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची बदली महावितरणच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी कल्याण येथे बदली झाली आहे. तर सोलापूरच्या जिल्हाधिकारीपदी समाज कल्याणचे आयुक्त मिलिंद शंभरकर यांची बदली झाली आहे. 

aschim-maharashtra/minister-musharraf-said-no-grouping-development-252966">हेही वाचा - मंत्री मुश्रीफ म्हणाले, नो गटबाजी 
राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश आज निघाला. सोलापूरच्या जिल्हाधिकारीपदी समाज कल्याणचे आयुक्त मिलिंद शंभरकर यांची बदली झाली असून सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची बदली महावितरणच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी कल्याण येथे बदली झाली आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांच्या अचानक बदलीप्रमाणे आज सोलापूरकरांना डॉ. भोसले यांच्या बदलीबाबत आश्‍चर्याचा धक्का बसला आहे. बैठकीनिमित्त डॉ. भोसले आज पुण्यात होते. सोशल मिडियावर आज दुपारच्या सुमारास अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश मिळाल्यानंतर डॉ. भोसले यांची खरच बदली झाली आहे का? याची खातरजमा करण्यासाठी विचारपूस सुरू झाली. शंभरकर हे पदोन्नतीने आयएएस झाले असून त्यांच्याकडे आता सोलापूरच्या जिल्हाधिकारीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 
जुन्या प्रश्‍नांचे नवे आव्हान? 
सोलापूरच्या विमानसेवेला अडथळा ठरणारी सिद्धेश्‍वर साखर कारखान्याच्या चिमणीचा विषय अद्यापही प्रलंबित आहे. या प्रश्‍नावर न्यायालयाने कारखान्याची बाजू फेटाळली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कारखान्याच्या भूमिकेबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. हा विषय नवीन पालकमंत्री वळसे-पाटील आणि जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर कसा सोडविणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीत माळशिरस तालुक्‍यातील राष्ट्रवादीच्या सदस्यांनी बंडखोरी केली. या सदस्यांना अपात्र करावे या मागणीची सुनावणी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुरू आहे. ही सुनावणी देखील जिल्ह्यासाठी लक्षवेधक आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solapur gets new Guardian Minister and Collector