
सोलापूर : विशेष स्वच्छता मोहिमेअंतर्गत महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या वतीने शहरात चार ठिकाणी अतिक्रमण हटाव मोहीम राबवली. महापालिकेच्या या कारवाईमुळे रस्ता वाहतुकीसाठी प्रशस्त झाल्याने रस्त्याने मोकळा श्वास घेतल्याचे चित्र दिसत होते. या कारवाईत लोखंडी खोके व इतर साहित्य जप्त करण्यात आले.