सोलापूरचे कार्यालये ओस, प्रवेशद्वारा आंदोलनकर्त्यांनी फुल्ल 

logo
logo
Updated on

सोलापूर : बुधवार आणि कामगारांचे आंदोलन हे सोलापूरचे गेल्या काही वर्षातील समिकरणच ठरलेले आहे. आजच्या बुधवारला भारत बंदची जोड मिळाली. सरकारी कार्यालयात बसून सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडविणारे कर्मचारीच आज रस्त्यावर उतरून आंदोलन करताना दिसत होते. जुन्या पेन्शनसह इतर मागण्यांसाठी सरकारी कर्मचारी आज आक्रमक झाले होते. कर्मचारी आंदोलनात उतरल्याने कार्यालये ओस पडली होती. नेहमीच्या तुलनेत आज आंदोलनकर्त्यांची संख्या वाढल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवेशद्वार आंदोलन कर्त्यांच्या गर्दीने गजबजून गेले होते. 
हेही वाचा - आमदार रमले शालेय आठवणीत 
सीटू कामगार संघटना संयुक्त कृती समिती, शासकीय सेवेतील तृतीय व चतुर्थ श्रेणी वर्गातील कर्मचारी संघटना, कामगार संघटना संयुक्त कृती समिती, एमएसईबी वर्कर्स फेडरेशन, जि. प. कर्मचारी युनियन, बॅंक ऑफ महाराष्ट्र एम्लॉईज युनियन, बीईएफआयय संघटना, महसूल कर्मचारी संघटना, ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियन, बीएसएनएल कर्मचारी युनियन, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, आशा वर्कर्स, औषध विक्रेता प्रतिनिधी, सिंचन कर्मचारी संघटना, राज्य परिचारिका संघटना मुख्यालय, सार्वजनिक बांधकाम कामगार संघ, सफाई मजदूर संघटना, सिव्हिल हॉस्पिटल युनियन, राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटना, सहकार कर्मचारी संघटना, लालबावटा रिक्षा युनियन, एलआयसी कर्मचारी संघटना, समाजकल्याण कर्मचारी संघटना, रेल माथाडी कॉट्रॅक्‍ट लेबर युनियन, सार्वजनिक बांधकाम कर्मचारी संघटना, पाटबंधारे कर्मचारी संघटना, शासकीय वाहन चालक संघटना, बहुजन क्रांती मोर्चा, राज्य सहकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटना, जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र कामगार सेना या संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. 
हेही वाचा - वणवा...वनांसोबतच वन्यजीवांनाही धोकादायक 
संपात 1049 कर्मचारी तर कार्यालयात फक्त 111 
आजच्या भारत बंदला महसूल यंत्रणेतील कर्मचाऱ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला. महसूल प्रशासनात एकूण 1 हजार 203 कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी आज रजेवर 43 जण होते. संपात 1 हजार 49 जण सहभागी झाले होते. 111 कर्मचारी कार्यालयात हजर होते. नायब तहसीलदार संवर्गातील 42 अधिकाऱ्यांपैकी 3 रजेवर, 8 संपात सहभागी झाले होते तर 31 कार्यालयात होते. अव्वल कारकून संवर्गातील 192 कर्मचाऱ्यांपैकी 5 रजेवर, 174 संपात आणि 13 कार्यालयात होते. मंडळ अधिकारी संवर्गातील 82 कर्मचाऱ्यांपैकी 2 रजेवर, 19 संपात आणि एक कार्यालयात होता. लिपिक संवर्गातील 228 कर्मचाऱ्यांपैकी 9 रजेवर, 204 संपात आणि 15 कार्यालयात होते. तलाठी संवर्गातील 450 कर्मचाऱ्यांपैकी 17 रजेवर, 427 संपात आणि 6 कार्यालयात होते. शिपाई संवर्गातील 143 कर्मचाऱ्यांपैकी 4 रजेवर, 133 संपात तर 6 कार्यालयात होते. 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com