वणवा.. वनासोबतच वन्यजीवांना धोकादायक! 

Forest Department efforts to prevent the fire-
Forest Department efforts to prevent the fire-

सोलापूर : वनक्षेत्रातील आगीच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी वन विभागाच्यावतीने उपाययोजना केल्या जात आहेत. ऑस्ट्रेलियातील जंगलात लागलेल्या वणव्याच्या घटनेनंतर "सकाळ'ने याबाबतचा आढावा घेतला. वन विभागाकडून जिल्ह्यात यंदा 950 हेक्‍टर क्षेत्रावर अग्निप्रतिबंधक उपाय म्हणून जाळरेषा घेण्यात येत आहे. 

हेही वाचा : संचालक ओळखीचे आहेत, अनेकांना नोकरी लावलीय! ​

माळरानावर मोठ्या प्रमाणात गवत
वन विभागाच्यावतीने जिल्ह्यात विविध ठिकाणी 950 हेक्‍टर क्षेत्रावर जाळरेषा घेतली जात आहे. याची लांबी तीन हजार 568 किलोमीटर इतकी असल्याचे वनविभाग सोलापूर कार्यालयाचे उपवनसंरक्षक प्रवीणकुमार बडगे यांनी सांगितले. जिल्ह्यात मोठे जंगल नसले तरी माळरानावर मोठ्या प्रमाणात गवत आहे. यंदा पाऊस चांगला झाल्याने गवत वाढलेले आहे. गवताला आग लागून झाडांसह वन्यजीवांना धोका निर्माण होऊ नये म्हणून वन विभागाकडून दक्षता घेतली जात आहे. सोलापूर शहरातील सिद्धेश्‍वर वनविहार या ठिकाणी पूर्वी मोठ्या प्रमाणात गवताला आग लागण्याचे प्रकार घडत होते. अलीकडे वनविभागाने केलेल्या उपाययोजनांमुळे आगीच्या घटनांवर नियंत्रण आले आहे. 

हेही वाचा : अन्‌ वकिलाने वाढदिवसाला घेतलेली सायकल काढली बाहेर!

वनासह वन्यजीवांनाही धोका

वनक्षेत्रामध्ये लागलेल्या आगीमुळे वनासह वन्यजीवांनाही धोका निर्माण होतो. वेगळ्या कारणांमुळे आगीच्या घटना घडतात. काही वेळा चिडून आग लावली जाते, तर काहीवेळा सर्वांच्या दुर्लक्षामुळे आग लागल्याच्या घटना घडतात. शेतकऱ्यांकडून स्वत:च्या शेतात आग लावून चिपाड जाळले जातात. अशा ठिकाणाहून ठिणगी उडून वनक्षेत्रात आगी लागतात, असे उपवनसंरक्षक बडगे यांनी सांगितले. 

वाळलेलं गवत हे पेट्रोल आणि डिझेलच्या बरोबरीने

आगीच्या घटनांमुळे वनक्षेत्रातील गवत, झाडे जळू नयेत यासाठी वन विभागाकडून दक्षता घेतली जात आहे. जंगलातून जाताना नागरिकांनी काळजी घ्यायला हवी. चुकूनही आपल्यामुळे आग किंवा अन्य कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडू नये यासाठी सर्वांनीच दक्ष राहायला हवे. वाळलेलं गवत हे पेट्रोल आणि डिझेलच्या बरोबरीने आहे. वाळलेल्या गवताला लागलेली आग विझवणं खूपच अवघड होतं. वाऱ्यामुळे ही आग वाढत जाते. 
- प्रवीणकुमार बडगे, 
उपवनसंरक्षक, वनविभाग, सोलापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com