सोलापूर ग्रामीणमध्ये 61 पॉझिटिव्ह ! दक्षिण सोलापुरात 23 तर बार्शीत 16 जणांना कोरोना 

तात्या लांडगे
Tuesday, 14 July 2020

'या' गावात सापडले नवे रुग्ण 
माळीनगर (माळशिरस) तीन, अक्‍कलकोट तालुक्‍यातील किणी व अंकलगीत प्रत्येकी एक, मोहोळमधील सिध्दार्थ नगर, देगावमध्ये प्रत्येकी एक तर कोरवली व टाकळी सिंकदर येथे दोन रुग्णांची आज भर पडली आहे. पंढरपुरातील संत पेठेत आठ, रोपळे, कान्हापुरी येथे प्रत्येकी एक, दक्षिण सोलापुरातील मंद्रूपमध्ये पाच, औरादमध्ये एक, बक्षिहिप्परगा, कुंभारी, नवीन विडी घरकूल येथे प्रत्येकी तीन, मुळेगाव तांडा दोन, भंडारकवठा सहा रुग्ण सापडले आहेत. माढ्यातील अकोले (दगड) एक रुग्ण तर बार्शीतील कसबा पेठ, म्हाडा कॉलनी, नागणे प्लॉट, बारंगळे प्लॉट, गुळपोळी, पानगाव, वैराग, बाभुळगावात प्रत्येकी एक, घाणेगावात चार, पिंपरी साकत व सासुऱ्यात प्रत्येकी दोन रुग्ण सापडले आहेत. 

सोलापूर : ग्रामीण भागात आज नव्याने 61 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. आता एकूण रुग्णसंख्या 960 झाली असून मृतांची संख्या 39 झाली आहे. आज दक्षिण सोलापूर तालुक्‍यात 23 तर बार्शी तालुक्‍यात 16 रुग्णांची भर पडली आहे. माढा तालुक्‍यातील मोडनिंबमधील 70 वर्षीय पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला. 

जिल्ह्यातील 960 पैकी 415 व्यक्‍ती बरे होऊन घरी परतले आहेत. तर 506 व्यक्‍तींवर विविध रुग्णालयांतून उपचार सुरु आहेत. आतापर्यंत ग्रामीणमधील सहा हजार 894 व्यक्‍तींची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. रुग्णांच्या संपर्कातील 71 व्यक्‍तींचे अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत. मंगळवारी (ता. 14) 47 रुग्णांना घरी सोडण्यात आले. 

'या' गावात सापडले नवे रुग्ण 
माळीनगर (माळशिरस) तीन, अक्‍कलकोट तालुक्‍यातील किणी व अंकलगीत प्रत्येकी एक, मोहोळमधील सिध्दार्थ नगर, देगावमध्ये प्रत्येकी एक तर कोरवली व टाकळी सिंकदर येथे दोन रुग्णांची आज भर पडली आहे. पंढरपुरातील संत पेठेत आठ, रोपळे, कान्हापुरी येथे प्रत्येकी एक, दक्षिण सोलापुरातील मंद्रूपमध्ये पाच, औरादमध्ये एक, बक्षिहिप्परगा, कुंभारी, नवीन विडी घरकूल येथे प्रत्येकी तीन, मुळेगाव तांडा दोन, भंडारकवठा सहा रुग्ण सापडले आहेत. माढ्यातील अकोले (दगड) एक रुग्ण तर बार्शीतील कसबा पेठ, म्हाडा कॉलनी, नागणे प्लॉट, बारंगळे प्लॉट, गुळपोळी, पानगाव, वैराग, बाभुळगावात प्रत्येकी एक, घाणेगावात चार, पिंपरी साकत व सासुऱ्यात प्रत्येकी दोन रुग्ण सापडले आहेत. 

तालुकानिहाय रुग्णसंख्या 

 • अक्‍कलकोट : 160 
 • बार्शी : 213 
 • करमाळा : 13 
 • माढा : 27 
 • माळशिरस : 15 
 • मंगळवेढा : 5 
 • मोहोळ : 54 
 • उत्तर सोलापूर : 102 
 • पंढरपूर : 57 
 • सांगोला : 6 
 • दक्षिण सोलापूर : 308 
 • एकूण : 960 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solapur Rural in 61 corona Positive