
-रामेश्वर विभूते
सोलापूर : सोमनाथच्या प्राचीन ज्योतिर्लिंगाचे अंश गुरुवारी सोलापुरात दर्शनासाठी दाखल झाले. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता हेरिटेज येथे दर्शन सोहळ्याचे आयोजन केले आहे. अकराव्या शतकात आक्रमणामुळे ज्योतिर्लिंगाची शकले उडाली होती. त्याचे दोन अंश उपलब्ध झाले आहेत. वैदिक धर्म संस्थानच्या यात्रेच्या माध्यमातून १००० वर्षांनी मूळ सोमनाथाचे दर्शनाची संधी असल्याचे समन्वयक डॉ. राजेंद्र गाजूल आणि लक्ष्मण भंडारी यांनी सांगितले.