
सोलापूर : सोलापूर बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी मंगळवारी ११ जणांनी १२ अर्ज दाखल केले आहेत. माजी सभापती राजशेखर शिवदारे, माजी उपसभापती सुरेश हसापुरे, माजी संचालक वसंत पाटील प्रमुख मान्यवरांचा यात समावेश आहे.