
टेंभुर्णी : पतीला जीवे मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीने महिलेवर गेल्या अकरा महिन्यांच्या दरम्यान वारंवार अत्याचार केला. याप्रकरणी तरुणाविरुद्ध टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टेंभुर्णी पोलिसांनी संशयित आरोपी तरुणास अटक करून माढा न्यायालयात हजर केले असता, मंगळवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिले आहेत.