
सोलापूर: जानेवारी २०२४ ते जुलै २०२५ या काळात सोलापूर शहर पोलिसांनी तब्बल ११४ जणांना तडीपार केले असून ३९ जणांची रवानगी पुण्यातील येरवडा कारागृहात केली आहे. मागील चार दिवसांत पोलिसांनी तिघांना तडीपार केले आहे. दोनपेक्षा जास्त गुन्हे केलेल्यांवर कारवाईचे सत्र सुरू असून आणखी २९ जण पोलिसांच्या रडारवर आहेत.