SSC Result 2023: विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती! 'या' दिवशी होणार अकरावी प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ

दहावी-बारावीचा निकाल जाहीर झाला, परंतु विद्यार्थ्यांना अद्याप गुणपत्रिका मिळालेल्या नाहीत. तरीपण, गुरुवारपासून अकरावी प्रवेशाला सुरवात करण्याचे नियोजन माध्यमिक शिक्षण विभागाने केले आहे. सोमवारी (ता. ५) त्यासंबंधीचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे.
SSC Result 2023: विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती! 'या' दिवशी होणार अकरावी प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ

सोलापूर : दहावी-बारावीचा निकाल जाहीर झाला, परंतु विद्यार्थ्यांना अद्याप गुणपत्रिका मिळालेल्या नाहीत. तरीपण, गुरुवारपासून अकरावी प्रवेशाला सुरवात करण्याचे नियोजन माध्यमिक शिक्षण विभागाने केले आहे. सोमवारी (ता. ५) त्यासंबंधीचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. सुरवातीला ऑनलाइन गुणपत्रिकेवरून प्रवेश अर्ज स्वीकारले जातील आणि मूळ गुणपत्रिका मिळाल्यावर प्रवेश अंतिम केला जाणार आहे.

जिल्ह्यातील ३२ हजार २०९ मुले तर २८ हजार ११९ मुली इयत्ता दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. निकालाची टक्केवारी यंदा ९६.०६ टक्के असून आता बहुतेक विद्यार्थ्यांचा कल विज्ञान व वाणिज्य शाखेकडेच असणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विज्ञान शाखेच्या ३२ हजार, वाणिज्य शाखेच्या २३ हजार ५०० आणि कला शाखेच्या १७ हजार तर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या दोन हजार जागा आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यास त्याच्या आवडीच्या शाखेत प्रवेश मिळेल, असा विश्वास माध्यमिक शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे. मेरिट यादीनुसार हे प्रवेश होणार आहेत.

जिल्ह्यात अकरावी प्रवेश ऑफलाईनच

सोलापूर जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये ऑनलाइन नव्हे तर ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. पण, मेरिट यादीवरूनच अनुदानित महाविद्यालयांमधील प्रवेश होतील. त्यामुळे विद्यार्थ्यांनी यादीनुसार तत्काळ आवडीच्या महाविद्यालयात अर्ज करून प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन देखील माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी केले आहे.

जास्त शुल्कासाठी प्रवेश नाकारल्यास कारवाई

एका विद्यार्थ्याने नामांकित दोन-तीन महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी अर्ज केलेला असतो. त्याला दोन महाविद्यालयात प्रवेश न मिळाल्यास तो शेवटी दुसऱ्या महाविद्यालयात प्रवेशासाठी जातो. पण, अनुदानितच्या जागा संपल्या असून आता विनाअनुदानितमध्ये प्रवेश घ्यावा लागेल म्हणून काही महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती नसतानाही अवाजवी प्रवेश शुल्क आकारले जाते. अशा तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित मुख्याध्यापकांची चौकशी करून कडक कारवाई केली जाईल, असा इशारा माध्यमिकचे शिक्षणाधिकारी जावेद शेख यांनी दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com