
सोलापूर : इयत्ता अकरावी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी आज (गुरुवारी) जाहीर झाली आहे. त्यातून दोन लाख ५१ हजार ८०४ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे.अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या गुणवत्ता यादीतून सोलापूरसह राज्यभरातील विज्ञान शाखेच्या एक लाख २९ हजार ३५ विद्यार्थ्यांसह वाणिज्य शाखेच्या ६९ हजार ४४२ आणि कला शाखेच्या ५३ हजार ३२७ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहेत.