
सोलापूर : जिल्ह्यातील १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या सर्वच वाहनांसाठी ‘एचएसआरपी’ (हायसेक्युरिटी प्लेट) नंबरप्लेट बसविणे बंधनकारक करण्यात आले. त्यासाठी राज्याच्या परिवहन विभागाने १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. जिल्ह्यातील नऊ लाख ३२ हजार वाहनांपैकी आतापर्यंत केवळ एक लाख १८ हजारांपर्यंतच वाहनचालकांनी त्यांच्या वाहनांना ‘एचएसआरपी’ नंबरप्लेट बसवून घेतली आहे. अजूनही जिल्ह्यातील आठ लाखांहून अधिक वाहनधारकांनी ती नंबरप्लेट बसवलेली नाही.