
सोलापूर : जेलरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत नगरसेवक सुनील कामाठी याच्या अवैध मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी काही दिवसांपूर्वी छापा टाकला होता. याप्रकरणी पोलिसांनी सुमारे दोनशे संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यातील आत्तापर्यंत 128 संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. आज पोलिसांनी एकाच दिवशी 40 संशयित आरोपींना अटक केली. या प्रकरणात व्यंकप्पा रद्दडगी हा नवा संशयित आरोपी समोर आला असून त्याला न्यायालयाने 15 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी ठोठवली आहे.
शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने आज अटक केलेल्यापैकी राकेश आनंत कोरे (रा. कोचीकोरवी गल्ली) याच्याकडे पोलिसांनी कसून तपास केला. त्यावेळी संशयित आरोपी व्यंकप्पा भीमण्णा रद्दडगी (रा. मल्लीकर्जून नगर, अक्कलकोट रोड) हा या गुन्ह्यातील आकाश कामाठी यांच्यासोबत मटक्याच्या चिठ्ठ्या व पैसे गोळा करीत असल्याचे उघड झाले. तर रद्दडगी हा सुनील कामाठी याचा नातेवाईक असल्याचेही तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर त्याला न्यायालयासमोर हजर केले आणि त्याची पोलिस कोठडी मागितली होती.
'यांना' केली अटक
शहर पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये महेश फुलचंद सालपे, संतोष भय्यमा गुर्रम, शिवशंकर विठ्ठल मोरे, नितीन प्रकाश धोत्रे, राकेश अनंत कोरे, रमेश मारुती विटकर, आकाश सुरेश खजुरे, महावीर शंकरसिंग परदेशी, सिद्राम अशोक तडका, संगमेश्वर उर्फ हरिओम रेवणसिद्ध पाटील, बसवराज पंचप्पा सोलापूरे, राघवेंद्र उर्फ जमखंडी बसवराज ममदापुरे, चंद्रकांत उर्फ समर्थ सिद्धारूढ जवळकोटे, सुधाकर शिवाजी भोसले, मंजुनाथ उर्फ सराना देविदास कंटली, संजय उर्फ श्रीनाथ शंकर विटकर, शिवाजी उर्फ कला शिंदे, मनपसंद बाबूलाल ताडपतरी, सदानंद उर्फ धानम्मा राऊतकर, शांतमल उर्फ समर्थ शिवपुत्रप्पा नागोरे, विरभद्र मल्लीनाथ शहापुरे, कोंडीबा उर्फ अक्षय बालाजी कंसाळे, महीबूब उर्फ रतन अल्लाबक्ष तिलगर, पांडुरंग उर्फ गुरु लिंगप्पा जमादार, नारायण उर्फ फुलारी गोविंद चारगुंडी, मल्लेशाम उर्फ केतन अंबाजी दंडी, ज्ञानेश्वर सिद्राम बुरा, प्रभाकर ऊर्फ विजय चंद्रकांत करणकोट, गणेश उर्फ समर्थ भगवान जाधव, चंद्रकांत उर्फ साईराम शंकर जाधव, गणेश ऊर्फ नागेश व्यंकटेश सूर्यवंशी, अमर उर्फ गौरी हरीश तारंग, रवींद्र कृष्णहरी आडम, प्रकाश व्यंकटेश यरझल, ज्ञानदेव उर्फ तिरुमाला लक्ष्मण माने, प्रसाद उर्फ श्रीकृष्ण रामचंद्र गंजी, विजयकुमार उर्फ जयगुरु नारायण कोंडा, श्रीनिवास उर्फ बंटी राजेशाम द्यावनपल्ली, अमरिश उर्फ आवकल अनिल बरडे आणि व्यंकप्पा रद्दडगी यांचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.