अकलूजमधून परप्रांतीयांना घेऊन १३ एसटी बस धावल्या

13 ST buses run from Akluj carrying other state workers
13 ST buses run from Akluj carrying other state workers
Updated on

अकलूज (सोलापूर) : अकलूज येथून परप्रांतीयांना घेवून १३ एसटी बसेस रवाना झाल्या. अकलूज उपविभागीय अधिकारी शमा पवार यांच्या आदेशानुसार परराज्यातील लोकांना आपल्या गावी जावे यासाठी अकलूजच्या नवीन एसटीबस स्थानकातून १३ बसेस सोडण्यात आल्या.

सर्व बसेस निर्जंतूकिकरण करण्यात आल्या होत्या. या बसेस एका सीटवर एक प्रवासी यानुसार २९० प्रवासी घेवून कुर्डुवाडी येथे सोडण्यासाठी रवाना करण्यात आल्या. हा प्रवास मोफत असून प्रवासादरम्यान सामाजिक अंतर पाळण्याविषयी सक्त सूचना देण्यात आल्या होत्या. शिवाय मास्क वापरणे बंधनकारक केले होते.

सरकारच्या तसेच काही सामाजिक संस्थांच्या वतीने प्रवाशांना अल्पोपहार, पाणी आदी वस्तू जाग्यावर पोहोच करण्यात आल्या होत्या. यावेळी माळशिरसचे तहसीलदार अभिजीत पाटील अकलूज आगार व्यवस्थापक तानाजी पवार, स्थानक प्रमुख संजय कदम, उपप्रमुख संजय वायदंडे, वरिष्ठ लिपिक उदय देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. प्रांत कार्यालयाच्या आदेशानुसार १३ बसेस निर्जंतूकिकरण करून उपलब्ध करून देण्यात आल्या मागणीनुसार आणखी बसेस उपलब्ध करून देणार आहोत, असे अकलूजचे आगार व्यवस्थापक तानाजी पवार यांनी सांगितले.
उपविभागीय अधिकारी शमा पवार म्हणाल्या, परराज्यातील नागरीकांनी अर्जभरले होते त्यांना आज कुर्डुवाडी येथे सोडण्यात आले आणखी सुमारे १५० अर्ज असून त्यासंबधी कार्यवाही सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com