esakal | लालपरीची चाके रुतली! 56 दिवसांत १३०० कोटींचे बुडाले उत्पन्न; एक लाख कर्मचाऱ्यांच्या वेतनाची चिंता अन् 'असा' काढला जातोय तोडगा

बोलून बातमी शोधा

1300 crore loss of ST bus in 56 days

वाहतूक सुरु करण्याचे अद्यापही आदेश नाहीत
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या हेतूने 22 मार्चपासून राज्यात लॉकडाउन जाहीर करण्यात आला असून त्याचा चौथा टप्पा 31 मेपर्यंत असणार आहे. लॉकडाऊनच्या 56 दिवसांमध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे दररोज सरासरी 22 कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. लॉकडाउन आणखी 13 दिवस वाढल्याने परिवहन सेवा सुरु करण्याचा निर्णय लांबणीवर पडला आहे. प्रवासी सेवा सुरु करण्याबाबत सरकारकडून अद्याप काहीच आदेश प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे आता महामंडळाअंतर्गत काम करणाऱ्या एक लाख चार हजार कर्मचाऱ्यांच्या पगारी कशा करायच्या, याची चिंता परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना लागली आहे. त्यांनी आता याची माहिती परिवहन मंत्र्याना दिली आहे. 

लालपरीची चाके रुतली! 56 दिवसांत १३०० कोटींचे बुडाले उत्पन्न; एक लाख कर्मचाऱ्यांच्या वेतनाची चिंता अन् 'असा' काढला जातोय तोडगा
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : लॉकडाउनमुळे 56 दिवसांपासून जगवा परिवहन मंडळाची आर्थिक स्थिती पुर्वपदावर येईपर्यंत त्यांच्या वेतनाचे टप्पे करण्याचे नियोजन सुरु असल्याचे महामंडळातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. तत्पूर्वी, महामंडळाच्या साडेसतरा हजार बस जागेवरच थांबल्या असून कोरोनाच्या विषाणूचा विळखा वाढू लागल्याने प्रवासी वाहतूकसुरु करण्याच्या अद्याप महामंडळाला आदेश मिळालेले नाहीत, अशी माहिती महामंडळाचे वहातूक व्यवस्थपाक राहूल तोरो यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.
एक लाख चार हजार कर्मचाऱ्यांचा भार सांभाळणारी लालपरी जागेवरच थांबल्याने कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न गंभीर बनला आहे. मागील काही वर्षांपासून अडचणीत सापडलेली लालपरी रुळावर आणण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांनी उत्पन्न वाढविण्याचे ठोस नियोजन केले होते. मात्र, कोरोनाच्या वैश्विक संकटामुळे लालपरीसमोरील अडचणीत पुन्हा वाढ झाली. खूप दिवसांपासून लालपरी जागेवरच थांबल्याने जिल्ह्यांमध्ये लालपरीची प्रवासी सेवा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले. मात्र, संबंधित जिल्ह्याने सावध पवित्रा घेत त्यास परवानगी नाकारली. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला. तरीही आता परजिल्ह्यातील नागरिकांसह काही परप्रांतीयांना त्यांच्या मूळगावी सोडण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मिळालेल्या रकमेतून वेतन भागवले जाईल, असेही सूत्रांनी सांगितले.

सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक कराव
वाहतूक सुरु करण्याचे अद्यापही नाहीत आदेश

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या हेतूने 22 मार्चपासून राज्यात लॉकडाउन जाहीर करण्यात आला असून त्याचा चौथा टप्पा 31 मेपर्यंत असणार आहे. लॉकडाऊनच्या 56 दिवसांमध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे दररोज सरासरी 22 कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. लॉकडाउन आणखी 13 दिवस वाढल्याने परिवहन सेवा सुरु करण्याचा निर्णय लांबणीवर पडला आहे. प्रवासी सेवा सुरु करण्याबाबत सरकारकडून अद्याप काहीच आदेश प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे आता महामंडळाअंतर्गत काम करणाऱ्या एक लाख चार हजार कर्मचाऱ्यांच्या पगारी कशा करायच्या, याची चिंता परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना लागली आहे. त्यांनी आता याची माहिती परिवहन मंत्र्याना दिली आहे. 

कामगार संघटनेने केली 'ही' मागणी 
लॉकडाऊन काळात काही जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची प्रवासी सेवा सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. तत्पूर्वी, महामंडळाच्या बस चालक व वाहकांना कोरोनाची भीती वाटू लागली आहे. कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाची सुरक्षितता म्हणून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना पोलिसांप्रमाणे 50 लाख रुपयांचे विमा कवच मिळावे, अशी मागणी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासह राज्य सरकारकडे केली आहे.
 
कर्मचारी बसूनच
मागील 56 दिवसांपासून मुंबईत सुरू असलेल्या काही मोजक्या बस वगळता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सर्वच बस जागेवर थांबून आहेत. दररोज सुमारे 22 कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले असून एक लाख 4 हजार कर्मचाऱ्यांपैकी बहुतांश कर्मचारी बसूनच आहेत. परिवहन सेवा सुरू करण्याबाबत अद्यापही राज्य सरकारकडून कोणतेही आदेश महामंडळाला प्राप्त झालेले नाहीत.
- राहूल तोरो, व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ