
सांगोला : कत्तलीसाठी अवैधरीत्या जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर सांगोला पोलिसांनी १७ मे रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास कारवाई केली आहे. यामध्ये जर्शी गाईची १४ लहान वासरे व म्हैशीचे एक रेडकू, अशी १५ जनावरे कत्तलीसाठी घेऊन जाताना आढळून आली. वाहन चालक रंगनाथ लक्ष्मण सकट (रा. खुपसंगी, ता. मंगळवेढा) व सचिन कांबळे (रा. वाकी घेरडी, ता. सांगोला) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.