
सोलापूर : सनई व डुंमूलचे (डफचे) मंगल सूर, नटलेली जोडपी, वऱ्हाडींची लगबग, फुलांनी सजवलेला भव्य मंडप, विवाह मंचापासून ते मड्डी वस्तीच्या चौकापर्यंत उपस्थित हजारो वऱ्हाड्यांचे हातात अक्षता घेऊन मंगलाष्टका सुरू होण्याकडे लागलेले कान. हा सर्व थाटमाट होता जुना तुळजापूर नाका परिसरातील मड्डी वस्ती येथील ५१ फुटी हनुमान गड मैदानावरील वडार समाजाच्या सामुदायिक विवाह सोहळ्यातील. हा विवाह सोहळा 'याची देही, याची डोळा' पाहण्यासाठी मड्डी वस्ती अक्षरश: गजबजून गेली होती.