
सोलापूर : सायबरच्या एक्स्पर्ट टीमने जळगाव येथून अटक केलेला आरोप सविनय धर्मकुमार गुरचळ (वय ३६) याला आज न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. सोलापूर शहर सायबर पोलिस ठाण्याने तपास केलेल्या हनीट्रॅप प्रकरणाची व्याप्ती सांगली आणि चंद्रपूरपर्यंत असल्याचे समोर आले आहे. आरोपींनी सांगलीत एकाची १७ लाख रुपयांची तर चंद्रपुरात ६० हजार रुपयांची फसवणूक केली आहे. मुंबईतील फसवणूक झालेला व्यक्ती तक्रार देण्यास समोर येत नसल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीशैल गजा यांनी दिली.