अक्कलकोट विधानसभा क्षेत्रातील 20 सरपंचांचा सत्कार समारंभ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

20 sarpanches of Akkalkot assembly felicitation ceremony Devendra Fadnavis gave special greetings over phone

अक्कलकोट विधानसभा क्षेत्रातील 20 सरपंचांचा सत्कार समारंभ!

अक्कलकोट : अक्कलकोट विधानसभा क्षेत्रातील मागील आठवड्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत एकूण 26 ग्रामपंचायतीचा निवडणूक निकाल जाहीर झाला. निकालानंतर भाजप,काँग्रेस व अन्य पक्षाकडून दावेप्रति दावे देखील करण्यात आले.

त्यावर आता भारतीय जनता पक्षाचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी आज एकूण 20 सरपंचांची बैठक घेऊन त्यांचा सत्कार सोहळा घडवून आणला आणि जोरदार शक्ती प्रदर्शन करीत आपल्या राजकीय विरोधकांना आपली राजकीय ताकद दाखवून दिली.आजच्या सत्कार सोहळ्यात निवडणुका झालेल्या 26 पैकी 20 सरपंचानी उपस्थित राहून सत्कार स्विकारल्याने विरोधकांचा 16 सरपंच निवडून आल्याचा केलेला दावा मात्र सपसेल फोल ठरला आहे.

या सर्व सरपंचांना त्यांनी शुभेच्छा देत आगामी काळात निवडून आलेल्या सर्व सरपंचांनी सत्ताधारी विरोधक असा कोणताही भेदभाव न करता गावाच्या विकासाचा ध्यास घेऊन सर्वांनी कार्य करावे. यासाठी मी आमदार म्हणून सर्वतोपरी आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहील अशी ग्वाही दिली. आपल्या गावातील उर्वरित कामांना कोणताही निधी कमी पडू दिला जाणार नाही.

वेळोवेळी सरपंचानी येऊन आपल्या गावच्या समस्या मांडाव्यात आणि त्यासाठी निधीची तरतूद करून घेऊन आपल्या गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणावा आणि जनतेने टाकलेला विश्वास सार्थ ठरवावा असे आवाहन देखील केले. दरम्यान याच सत्कार सोहळ्याच्या प्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या नूतन सरपंचाचा खास अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या. केंद्र सरकारने आता गाव पातळीवर मोठ्या प्रमाणात निधी देण्यास सुरुवात केली असून त्या सर्व निधींचा सुद्धा उपयोग करावा आणि आपल्यावर जनतेने जो प्रचंड विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला सर्वांनी पात्र राहून काम करावं आणि गावकऱ्यांचं संपूर्ण विकास करून त्यांच्या समाधान करावे असे आवाहन देखील केले.

दूरध्वनीच्या माध्यमातून फडणवीस यांनी या नूतन सरपंच असे संवाद साधत त्यांना दिलासा दिला आणि महाराष्ट्र शासनाकडून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कोणत्याही प्रकारच्या निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही याची ग्वाही देखील दिली. यावेळी झालेल्या सत्कार सोहळ्यात कोन्हाळी,दहीटणेवाडी, खानापूर, अंकलगी, रूद्देवाडी, शिरवळ, शिरवळवाडी, सदलापूर, आरळी, दर्शनाळ, तोगराळी, गंगेवाडी, दर्गनहळळी,आचेगाव,रामपूर,अंकलगे, घोळसगाव, सुलतानपूर,बोरेगाव,नाविंदगी आदीसह विस ग्रामपंचायत सरपंच आणि उपस्थित सदस्यांचा देखील सत्कार करण्यात आला.

यावेळी अक्कलकोट भाजपा अध्यक्ष मोतीराम राठोड शहराध्यक्ष शिवशरण जोजन, प्रभाकर मजगे,अरविंद ममनाबाद,सागर कल्याणशेट्टी, मिलन कल्याणशेट्टी, सुनील बंडगर, अविनाश मडीखांबे, रामप्पा चिवडशेट्टी,अंकुश चौगुले, कांतु धनशेट्टी, दयानंद उंबरजे,महिबूब मुल्ला, प्रदीप पाटील, अमर पाटील, अप्पासाहेब बिराजदार,अप्पासाहेब पाटील, चंद्रकांत इंगळे, परमेश्वर यादवाड राजेंद्र बंदी छोडे , जायशेखर पाटील, अबूबकर शेख, प्रदीप जगताप,श्रीमंत कुंटोजी, मधुकर चिवरे, रामचंद्र होनराव, अनिल बर्वे, राजेंद्र काकडे, विनोद बिराजदार, दयानंद बमनळी, सुधीर मचाले आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.सूत्रसंचालन प्रदीप पाटील वागदरी यांनी केले.