मुद्रा योजनेतून २३ हजार कोटींचे कर्जवाटप

राज्यातील ३९ लाख व्यावसायिकांना लाभ
Mudra yojna
Mudra yojnaSakal
Updated on

सोलापूर - मुद्रा योजनेंतर्गत राज्यात ३९ लाख ३९ हजार व्यावसायिकांना २३ हजार ३५२ कोटी रुपयांचे कर्जवाटप केले गेले. मुद्रा योजनेत महाराष्ट्रात नवव्यवसायिकांचे शिशू, किशोर व तरुण असे गट करून व्यवसायाच्या प्रगतीच्या टप्प्यानुसार कर्ज वाटप करण्यात आले आहे. या गटात कर्ज वाटपाची मर्यादा निश्चित केली गेली.

शिशू गटामध्ये ३१ लाख ६९ हजार २९८ व्यावसायिकांना कर्ज वाटप झाले. या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ८ हजार ९०६ कोटी ठेवण्यात आले होते. त्यापैकी ८ हजार ८८५ कोटी रुपयांची कर्जे वितरीत करण्यात आली. यामध्ये नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे ९३७ कोटी रुपयांचे कर्ज वाटप झाले आहे.

किशोर गटामध्ये ६ लाख ८६ हजार लाभार्थींना कर्जवाटप करण्यात आले आहे. त्यासाठी ८ हजार ४७२ कोटी रुपये वाटपाच्या उद्दिष्टापैकी ८ हजार ३१२ कोटी रुपयांचे कर्जवाटप केले गेले. यामध्ये पुणे जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे ७३५ कोटी रुपयांचे कर्जवाटप झाले आहे. मुद्रा योजनेच्या तरुण गटात आतापर्यंत ८२ हजार ८५१ लाभार्थींना कर्जवाटप केले गेले आहे. तरुण गटासाठी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ६ हजार ३५१ कोटी रुपये ठेवण्यात आले होते. त्या तुलनेत ६ हजार १५४ कोटी रुपये कर्जवाटप झाले आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे ७८० कोटी रुपये कर्जवाटप करण्यात आले.

मुद्रा योजनेचा लेखाजोखा

  • शिशू गटात सर्वाधिक कर्जवाटप नागपूर जिल्ह्यात

  • किशोर व तरुण गटात सर्वाधिक कर्जवाटप पुणे जिल्ह्यात

  • शिशू गटात राज्यात ३१ लाख ३९ हजार लाभार्थींना ८ हजार ९०६ कोटी रुपये कर्जवाटप

  • किशोर गटात राज्यात ६ लाख ८६ हजार ९५५ लाभार्थींना ८ हजार ३१२ कोटींचे कर्जवाटप

  • तरुण गटात राज्यात ८२ हजार ८५२ लाभार्थींना ६ हजार १५४ कोटी रुपयांचे कर्जवाटप

  • मुद्रा योजनेअंतर्गत ३९ लाख ३९ हजार १०४ लाभार्थींना २३ हजार ३५२ कोटींचे कर्जवाटप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Rutuja Nagtilak-Dhok contributing to the world’s longest tunnel “Missing Link” project as project manager in Italy-based company.
Concerned schoolgirl at SVCS after failing to reach her mother on phone.
Solapur district murder cases
boramani murder
Marathi News Esakal
www.esakal.com