Solapur News : 'श्री विठ्ठलाचे २४ तास दर्शन बंद'; प्रक्षाळपूजेने गेला देवाचा शीण, राजोपचार सुरू
Pandharpur Temple Rituals : प्रक्षाळपूजेनंतर देवाचे सर्व राजोपचार सुरू करण्यात आले. मंदिर समितीचे सदस्य भास्करगिरी बाबा व प्रकाश महाराज जवंजाळ यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची प्रक्षाळ पूजा करण्यात आली. पूजेच्या सुरवातीला मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री व लेखाधिकारी मुकेश अनेचा यांच्या हस्ते देवाला पहिले स्नान घालण्यात आले.
Vitthal Darshan closed for 24 hours after Prakshal Puja; royal rest rituals ongoing at Pandharpur temple.esakal
पंढरपूर : आषाढी यात्रेच्या सोहळ्यानंतर बुधवारी (ता.१६) श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची प्रक्षाळ पूजा झाली. आजपासून देवाचे राजोपचार सुरू करण्यात आले. दरम्यान आषाढीवारी काळात सुरू असलेले देवाचे २४ तास दर्शनही आजपासून बंद झाले आहे.