esakal | सोलापूरच्या ग्रामीण भागात 246 कोरोनाबाधित 
sakal

बोलून बातमी शोधा

सोलापूरच्या ग्रामीण भागात 246 कोरोनाबाधित 

तालुकानिहाय कोरोनाबाधित रुग्ण कंसात मृत्यू 
अक्कलकोट- 1028 (57), बार्शी- 4833 (152), करमाळा-1948 (39), माढा- 2668 (82), माळशिरस-4328 (84), मंगळवेढा- 1219 (24), मोहोळ- 1099 (53), उत्तर सोलापूर- 691 (29), पंढरपूर- 5037 (125), सांगोला- 1931 (27), दक्षिण सोलापूर- 1267 (36), एकूण- 26049 (707). 

सोलापूरच्या ग्रामीण भागात 246 कोरोनाबाधित 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सोलापूर ः सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आज 246 जण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले. आज एक हजार 721 जणांची तपासणी करण्यात आले. त्यापैकी एक हजार 475 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर 246 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. या 246 जणांमध्ये 146 पुरुष तर 100 महिलांचा समावेश आहे. आज रुग्णालयातून विक्रमी लोकांना घरी सोडण्यात आले. कोरोनाचे संक्रमण सुरु झाल्यापासून आज जवळपास एक हजार 128 एवढ्या लोकांना कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. त्याचबरोबर आज कोरोनामुळे आठ जणांचा मृत्यू झाला आहे. 

जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आत्तापर्यंत 26 हजार 49 जणांना कोरोनाची लागण झाली आहे तर 707 जणांना कोरोनामुळे आपला प्राण गमवावा लागला आहे. कोरोनाबाधित झाल्यामुळे अद्यापही पाच हजार 193 जण वेगवेगळ्या रूग्णालयात उपचार घेत आहेत. कोरोनामुक्त होऊन 20 हजार 149 जण घरी सुखरूप पोहोचले आहेत. आज कामती खुर्द हराळवाडी (ता. मोहोळ) येथील 56 वर्षाचे पुरुष, एखतपूर (ता. सांगोला) येथील 22 वर्षाची महिला, समतानगर पंढरपूर येथील 62 वर्षाचे पुरुष, बक्षी हिप्परगा (ता. दक्षिण सोलापूर) येथील 84 वर्षाचे पुरुष, पेनूर (ता. मोहोळ) येथील 34 वर्षाचे पुरुष, खंदकरोड करमाळा येथील 74 वर्षाचे पुरुष, पांडे (ता. करमाळा) येथील 72 वर्षाचे पुरुष तर भक्ती मार्ग पंढरपूर येथील 70 वर्षाच्या पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 


 

 
 

loading image