
-प्रमोद बोडके
सोलापूर: जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणाची प्रभागरचना अंतिम झाल्यानंतर आरक्षण सोडतीची नियमावली प्रसिद्ध झाली. जिल्हा परिषदेच्या पाठोपाठ आता नगरपरिषदांच्या निवडणुकांचीही प्रक्रिया वेग धरू लागली आहे. जिल्ह्यातील ११ नगरपरिषदांच्या प्रारूप प्रभागरचनेवर सध्या हरकती स्वीकारल्या जात आहे. या प्रभागरचनेवर हरकतींचा अक्षरश: पाऊस पडू लागला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातून आलेल्या ४१ हकरतींमध्ये एकट्या मंगळवेढ्यातील २० तर बार्शीतील ८ हरकतींचा समावेश आहे.