महापालिकेतील 30 डॉक्‍टरांना दाखवला घरचा रस्ता

महापालिकेतील 30 डॉक्‍टरांना दाखवला घरचा रस्ता
Summary

महापालिका आयुक्‍तांनी 13 स्वॅब कलेक्‍टर व 17 बीएएमएस डॉक्‍टरांची मानधनावरील सेवा थांबविली आहे.

सोलापूर : शहरातील कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव कमी करण्याच्या हेतूने महापालिकेने कंत्राटी तत्त्वावर जवळपास 55 ते 60 डॉक्‍टर (doctors), स्वॅब कलेक्‍टर यांची नेमणूक केली होती. मागील काही दिवसांपासून शहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर महापालिका आयुक्‍तांनी 13 स्वॅब कलेक्‍टर (Swab Collector) व 17 बीएएमएस डॉक्‍टरांची (BAMS Doctor) मानधनावरील सेवा थांबविली आहे. (30 doctors of solapur municipal corporation have been dismissed)

महापालिकेतील 30 डॉक्‍टरांना दाखवला घरचा रस्ता
सोलापूर जिल्ह्यातील लसीकरण केंद्रे बंद

कोरोनाच्या दोन्ही लाटेत शहरातील प्रादुर्भाव कमी करण्याच्या कामात कंत्राटी डॉक्‍टरांनी मोठी मदत केली. कोरोना चाचणी, लसीकरण, कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग, कन्टेनमेंट झोन करणे अशा विविध प्रकारची कामे त्यांनी केली. काही दिवसांपूर्वी त्यांनी मानधन कमी केल्यावरून आंदोलनही केले होते. त्यावेळी महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या निर्देशानुसार आयुक्‍तांना आपला निर्णय मागे घ्यावा लागला होता. दरम्यान, शहरातील कोरोना कमी झाला असून भविष्यात गरज भासल्यास त्यांची फेरनियुक्‍ती केली जाईल, असे आयुक्‍तांनी त्यांच्या आदेशात म्हटले आहे.

महापालिकेतील 30 डॉक्‍टरांना दाखवला घरचा रस्ता
सोलापूर विद्यापीठाची 5 जुलैपासून परीक्षा

यांना केले कार्यमुक्त

आयुक्‍तांच्या आदेशानुसार डॉ. प्रकाश तोलाणी, डॉ. संतोष थिटे, डॉ. प्रकाश अलदर, डॉ. संप्रती भोस, डॉ. माधुरी पाटील, डॉ. श्रुतिका कोष्टी, डॉ. लक्षिता घोडके, डॉ. सारिका सोनी, डॉ. पुजा पिसे, डॉ. अझहरोद्दीन शेख, डॉ. सुप्रिया पवार, डॉ. यशोधरा शहा या स्वॅब कलेक्‍टरसह डॉ. सुप्रिया लवटे, डॉ. प्रविण भोस, डॉ. अमृता भोसले, डॉ. दिशाली दोशी, डॉ. ममता रजपूत, डॉ. सिमा शेख, डॉ. यास्मिन मुलाणी, डॉ. कादिर मुलाणी, डॉ. मेघना भालेराव, डॉ. प्रतिक्षा येळगे, डॉ. रोहिणी सरडे, डॉ. शरयू मोटे, डॉ. नयना चाकोते, डॉ. ज्योती केत, डॉ. झिनत शेख, डॉ. दिपाली पवार आणि डॉ. वसुधा उकरंडे यांना कार्यमुक्‍त केले आहे.

महापालिकेतील 30 डॉक्‍टरांना दाखवला घरचा रस्ता
'या' पंचसुत्रीमुळेच कमी झाली दुसरी लाट! सोलापूर कोरोनामुक्‍तीकडे

महापालिकेला सोसवेना आर्थिक भार

कोरोना काळात महापालिकेच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. दरमहा सरासरी 28 ते 30 कोटींचे उत्पन्न अपेक्षित असतानाही मागील तीन महिन्यात महापालिकेला पाच ते सहा कोटींपर्यंतच उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे कंत्राटी डॉक्‍टरांचे मानधन आरोग्य मिशनमधून काहीवेळा दिल्याची चर्चा आहे. सध्या महापालिकेचा सर्वाधिक खर्च वेतनावर होऊ लागला आहे. अशा परिस्थितीत कंत्राटी कर्मचाऱ्यांचा खर्च न पेलवणारा आहे. सध्या कोरोना कमी झाला असल्याने डॉक्‍टरांची एवढ्या मोठ्या प्रमाणावर गरज नसल्याने त्यांना कार्यमुक्‍त केल्याचे बोलले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com