सोलापूर जिल्ह्यातील लसीकरण केंद्रे बंद

सोलापूर जिल्ह्यातील लसीकरण केंद्रे बंद
Summary

जिल्ह्यातील 72 खासगी केंद्रातून लसीकरण करण्यास जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी परवानगी दिली होती.

सोलापूर : जिल्ह्यातील ग्रामीण भागात दररोज आढळणाऱ्या कोरोनाची (Corona) रुग्णांची (Patient)संख्या तीनशेहून अधिक आहे. डेल्टा या नव्या व्हेरिएंटमुळे आणि तिसऱ्या लाटेच्या भितीने 18 वर्षांवरील तरूणांसह ज्येष्ठ नगारिक लस (vaccination) टोचून घेण्यासाठी पुढे येत आहेत. मात्र, शनिवारी (ता. 26) लसीअभावी शहर-ग्रामीणमधील एकही केंद्र सुरू नव्हते. लसीची मागणी केली आहे, परंतु पुण्यावरून काहीच निरोप नसल्याने लस (vaccination) कधीपर्यंत मिळेल, हे अनिश्‍चितच असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. (vaccination centers are closed in solapur district)

सोलापूर जिल्ह्यातील लसीकरण केंद्रे बंद
सोलापूर विद्यापीठाची 5 जुलैपासून परीक्षा

जिल्ह्यातील साखर कारखाने, खासगी कंपन्यांसह खासगी दवाखान्यांनी तब्बल 60 हजार डोसची मागणी केली आहे. परंतु, चार दिवस होऊनही आणखी लस मिळालेली नाही. जिल्ह्यातील 72 खासगी केंद्रातून लसीकरण करण्यास जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी परवानगी दिली होती. आता आणखी 13 कारखाने, खासगी दवाखाने व काही कंपन्यांनी लसीकरणास परवानगी मागितली आहे. त्या खासगी केंद्रांकडून संबंधित आस्थापनातील कर्मचाऱ्यांना व खासगी दवाखान्यातून पैसे घेऊन लस टोचण्याचे नियोजन आहे. मात्र, लस मिळत नसल्याने मान्यता मिळूनही ही केंद्रे बंदच आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील लसीकरण केंद्रे बंद
'या' पंचसुत्रीमुळेच कमी झाली दुसरी लाट! सोलापूर कोरोनामुक्‍तीकडे

दरम्यान, महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत 36 दवाखान्यांनाही लसीकरणास परवानगी यापूर्वीच दिली आहे. मात्र, त्यांनाही लस मिळाली नसून त्याठिकाणी लसीकरण बंदच आहे. दरम्यान, शनिवारी मोहोळ व सोलापूर शहरातील काही नागरी आरोग्य केंद्रांवर तुरळक प्रमाणात लसीकरण झाल्याचे पहायला मिळाले. लस संपल्याने आज (रविवारी) संपूर्ण जिल्हाभरातील लसीकरण बंदच राहील, अशी माहिती जिल्हा समन्वयक डॉ. अनिरूध्द पिंपळे यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.

सोलापूर जिल्ह्यातील लसीकरण केंद्रे बंद
अक्कलकोट-सोलापूर महामार्ग पाच महिन्यात होणार पूर्ण, लवकरच टोलही सुरू

आता दुसऱ्या डोसलाच प्राधान्य

शहरातील 21 तर ग्रामीणमधील 70 केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. त्याठिकाणी 18 ते 44 आणि 45 ते 59 वयोगटातील व 60 वर्षांवरील व्यक्‍ती आणि 45 वर्षांवरील को-मॉर्बिड रुग्ण असे लसीकरणाचे टप्पे करण्यात आले आहेत. लस पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याने आता लस उपलब्ध झाल्यानंतर 18 ते 44 वयोगटातील लसीकरण बंद ठेवून को-मॉर्बिड आणि 60 वर्षांवरील व्यक्‍तींच्या दुसऱ्या डोसला प्राधान्य दिले जाईल, असेही डॉ. पिंपळे यांनी यावेळी सांगितले. (vaccination centers are closed in solapur district)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com