esakal | सोलापूरच्या ग्रामीण भागात आज आढळले 311 कोरोना बाधित 
sakal

बोलून बातमी शोधा

सोलापूरच्या ग्रामीण भागात आज आढळले 311 कोरोना बाधित 

सोलापूर ः जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आज नव्याने 311 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. आज एक हजार 213 जणांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. त्यापैकी 902 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून 311 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचबरोबर आज आठ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. त्यामुळे एकूण मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता 283 एवढी झाली आहे तर बाधितांची संख्या 10 हजार पार करत दहा हजार 32 एवढी झाली आहे. 

सोलापूरच्या ग्रामीण भागात आज आढळले 311 कोरोना बाधित 

sakal_logo
By
संतोष सिरसट

सोलापूर ः जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आज नव्याने 311 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. आज एक हजार 213 जणांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. त्यापैकी 902 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून 311 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचबरोबर आज आठ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. त्यामुळे एकूण मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता 283 एवढी झाली आहे तर बाधितांची संख्या 10 हजार पार करत दहा हजार 32 एवढी झाली आहे. 

आज लक्ष्मी टाकळी (ता. पंढरपूर) येथील 45 वर्षाची पुरुष, हिवरगाव (ता. मंगळवेढा) येथील 50 वर्षाची महिला, देशमुख प्लॉट बार्शी येथील 56 वर्षांचे पुरुष, राळेरास (ता. बार्शी) येथील 55 वर्षाचे पुरुष, तांदुळवाडी (ता. माढा) येथील 61 वर्षाची महिला, कुंभेज (ता. माढा) येथील 85 वर्षांचे पुरुष कण्हेर (ता. माळशिरस) येथील 70 वर्षाचे पुरुष तर राशिन पेठ करमाळा येथील 52 वर्षांच्या पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

या गावात आढळले नवे कोरोनाबाधित 
अक्कलकोमधील ए-वन चौक, बुधवार पेठ, चपळगाववाडी, गौडगाव बुद्रुक, जेऊर, कुरनूर, मैंदर्गी, समाधी मठ, सुलेरजवळगे, तोळणूर, बार्शीतील अलीपूर, बाबर प्लॉट, धामणगाव, काळेगाव, कासारवाडी, कासारवाडी रोड, खांडवी, मंगळवार पेठ, राऊत गल्ली, उंबरगे, उपळाई रोड, करमाळ्यातील बिटरगाव, दत्त पेठ, कमला नगर, कंदर, केम, राशिन पेठ, शिवाजीनगर, सिद्धार्थनगर, तेली गल्ली, माढा तालुक्‍यातील अरण, भोसरे, चिंचोली, फुटजवळगाव, कुर्डू, कुर्डूवाडी, मोडनिंब, तुळशी, उपळवटे, मंगळवेढा तालुक्‍यातील अरळी, दामाजी नगर, कचरेवाडी, कुंभार गल्ली, सराफ गल्ली, मोहोळ तालुक्‍यातील आढेगाव, बेगमपूर, कळसे नगर, कोन्हेरी, कुरुल, मोहोळ स्टेशन, पंढरपूर तालुक्‍यातील आंबे, अनिल नगर, बडवे गल्ली, भुयाचा मारुतीजवळ, चळे, डाळे गल्ली, देगाव, डोंबे गल्ली, गणेश नगर, इसबावी, जुनी पेठ, लक्ष्मी टाकळी, महावीर नगर, मेंढापूर, नागपूरकर मठाजवळ, नेमतवाडी, रामबाग, रोपळे, सांगोला रोड, संत पेठ, स्टेशन रोड, उमदे गल्ली, सांगोल्यातील बलवडी, गायगव्हाण, गोडसेवाडी, जवळा, नाझरे, वासूद रोड, दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील आचेगाव, आहेरवाडी, औराद, बंकलगी, फताटेवाडी, होटगी स्टेशन, मद्रे, मंद्रूप, एनटीपीसी कॉलनी, शिंगडगाव, माळशिरस तालुक्‍यातील अकलूज, आनंदनगर, बोरगाव, देशमुख वाडी, डोंबळवाडी, फोंडशिरस, गिकझानी, कण्हेर, लक्ष्मीनगर, महाळूंग, माळीनगर, माळखांबी, मारकडवाडी, संग्रामनगर, शेंडेचिंच, श्रीपूर, तांदुळवाडी, तिरवंडी, वेळापूर, यशवंत नगर येथे आज नव्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. 

loading image
go to top