

Solapur Zilla Parishad Audit Flags 2 Point 13 Crore Rent Paid To 37 Ashram Schools Over Additional Space Claims
sakal
-विठ्ठल सुतार
सोलापूर : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या कारभारावर लेखापरीक्षणात गंभीर ताशेरे ओढण्यात आले आहेत. आश्रमशाळांनी अतिरिक्त जागा दाखवून तब्बल २ कोटी १३ लाख रुपयांचे इमारत भाडे घेतल्याचे लेखापरीक्षणातून समोर आले आहे. समाजकल्याण अधिकाऱ्यांनी नियमबाह्य पद्धतीने भाडे मंजूर केल्याचेही निदर्शनास आले असून, संबंधित वसतिगृहाची मान्यता रद्द करण्याची शिफारस मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. या प्रकरणात समाजकल्याण विभागासोबतच वित्त विभागाच्या कार्यपद्धतीवरही लेखापरीक्षकांनी ताशेरे ओढले आहेत.