

Questions raised as only a few sugar mills face action despite ₹400 crore dues in Solapur.
sakal
उ. सोलापूर: सोमवारी पुणे येथे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची रक्कम थकवणाऱ्या तीन कारखान्यांवरील आरआरसी कारवाईसंदर्भात सुनावणी झाली. जिल्ह्यातील वीसहून अधिक कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या उसाची रक्कम थकवली आहे.
त्यांच्यावर तत्काळ आरआरसी कारवाईची मागणी शेतकरी संघटनांकडून होत असताना काही मोजक्याच कारखान्यांवर कारवाई होत असल्यामुळे प्रशासन राजकीय दबावापुढे झुकत असल्याचा आरोप होत आहे.