

Proposed Pandharpur Corridor project expected to reshape the temple town with ₹4,000 crore investment.
Sakal
प्रमोद बोडके
सोलापूर : संपूर्ण महाराष्ट्राला आध्यात्मिक धाग्याने बांधून ठेवणाऱ्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या विकासाकडे राज्य सरकारने विशेष लक्ष दिले आहे. वाराणसीतील काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या धर्तीवर पंढरपुरात भव्य कॉरिडॉर उभारण्यासाठी आवश्यक पूर्वतयारी पूर्ण झाली असून, येत्या अर्थसंकल्पात या प्रकल्पाची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून (ता. २३) सुरू होत आहे. यंदाचा अर्थसंकल्प ६ मार्च रोजी मांडला जाणार आहे.